व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिला व बाळ दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 21, 2026
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या ३७ वर्षीय महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री (दि. १८) घडली. दरम्यान, आई आणि बाळ या दोघांच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.

रुपाली सोमनाथ इंदलकर (वय ३७, रा. कुसगाव, लोणावळा) असे मृत महिलेचे नाव आहे. रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने हा अनर्थ घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच त्यावेळी उपस्थित संबंधित डॉक्टरांनी चार ते पाच तास उपचाराची माहिती लपविल्याचेही नातेवाईकांनी माध्यमांना सांगितले. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा, हत्येचा गुन्हा दाखल व्हावा, अशी नातेवाईकांची मागणी आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार सुनील शेळके यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली व सांत्वन केले. तसेच ‘‘आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून ‘ओपन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात येईल. महिनाभरात या प्रकारातील सत्य समोर येऊन कुटुंबियांना न्याय मिळेल’’ असे आश्वासन दिले.

‘‘संबंधित महिला थायरॉइड आणि उच्च रक्तदाबामुळे गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. उपचारादरम्यान हृदयविकाराचा त्रास झाला. त्यामुळे सिझेरियन शस्त्रक्रिया केली. मात्र, मातेला वाचवता आले नाही. ‘एनआयसीयू’ बेड उपलब्ध नसल्याने बाळाचाही मृत्यू झाला. यात डॉक्टरांचा हलगर्जीपणा झालेला नाही,’’ असा दावा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी यांनी केला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
–
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– 
टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका

–
शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू
– 
महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद


dainik maval jahirat

Previous Post

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

Next Post

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती 'विकासाच्या रस्त्यापासून' वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.