व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिद्दीला नवे आकाश

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 21, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला आणि जिद्दीला योग्य संधी मिळाल्यास ते जागतिक पातळीवरही यश मिळवू शकतात, याची प्रचिती मावळ तालुक्यातील तीन बालवैज्ञानिकांच्या निवडीने आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष निवड प्रक्रियेतून जिल्ह्यातील १०३ विद्यार्थ्यांची इस्रो, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या अभ्यासदौऱ्यासाठी अंतिम निवड झाली असून, त्यामध्ये मावळ तालुक्यातील तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मावळ तालुक्यातील स्वराली सचिन लोखरे (जि. प. प्राथमिक शाळा, दिवड) हिची इस्रोच्या अभ्यासदौऱ्यासाठी, तर श्लोक भिमराव तुळजापूरे (जि. प. प्राथमिक शाळा, वराळे) आणि आराध्या प्रशांत भोईर (जि. प. प्राथमिक शाळा, सांगवडे) यांची नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश मावळच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या तिन्ही बालवैज्ञानिकांचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करताना, ग्रामीण भागातील मुलांच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि वैज्ञानिक कुतूहलाला अशा उपक्रमांमुळे नवे आकाश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रो, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीसारख्या जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थांना भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला निश्चितच नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण असणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण आणि गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि शिक्षणाच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यावर आपला भर असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळाल्यास ग्रामीण भागातूनही भविष्यात वैज्ञानिक, संशोधक आणि विविध क्षेत्रांतील गुणवंत घडू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

मावळातील विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांच्या पालकांसह शिक्षक, मुख्याध्यापक आणि संपूर्ण शाळा परिवाराचेही कौतुक होत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, जिल्हा परिषद शाळांमध्येही गुणवत्तेची आणि प्रतिभेची कमतरता नसल्याचे या निवडीने अधोरेखित केले आहे.

मावळच्या या तिन्ही बालवैज्ञानिकांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून अंतराळ संशोधन आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भविष्यात उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा आमदार सुनील शेळके यांच्या वतीने देण्यात आल्या. ग्रामीण मावळच्या मातीतून इस्रो आणि नासापर्यंत पोहोचलेल्या या विद्यार्थ्यांची भरारी तालुक्याच्या शैक्षणिक वाटचालीला नवी प्रेरणा देणारी ठरणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
–
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– 
टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका

–
शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू
– 
महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद


dainik maval jahirat

Previous Post

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

Next Post

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.