व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

मावळ खरेदी विक्री संघाच्या 'शेतकरी भवन'ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 9, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या प्रस्तावित शेतकरी भवन इमारती दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मासिक सभेमध्ये मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सभापती किरण हुलावळे व उपसभापती सुनीता केदारी यांनी दिली.

खरेदी विक्री संघाचे सभापती किरण हुलावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेमध्ये संचालक गणेश विनोदे यांनी अजित दादा पवार यांचे मावळ तालुक्याच्या विकासासाठी असलेले भरीव योगदान तसेच प्रामुख्याने शेतकरी हिताच्या दृष्टीने अखेरपर्यंत घेतलेली भूमिका लक्षात घेऊन प्रस्तावित शेतकरी भवनाच्या इमारतीस स्व.अजित दादा पवार यांचे नाव देण्यात यावे असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला ज्येष्ठ संचालक भरत येवले यांनी अनुमोदन दिले तर उपस्थित सर्व संचालकांनी सहमती दर्शवली.

यावेळी माजी सभापती शिवाजी असवले, संचालक एकनाथ येवले, माणिक गाडे, ज्ञानेश्वर निंबळे, शहाजी कडू, बाजीराव वाजे, रुपेश घोजगे, रमेश भुरुक, विष्णू घरदाळे, प्रमोद दळवी, मधुकर जगताप, मनीषा आंबेकर, आशा खांडभोर, विष्णू मुऱ्हे, विठ्ठल घारे, सचिव किरण लोहर उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विशेष सहकार्याने खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून कामशेत येथील संस्थेच्या जागेवर सुमारे १५ कोटी रुपये निधीतून सुसज्ज असे शेतकरी भवन उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यास सहकार मंत्री पाटील यांनीही मान्यता दिली आहे.

दरम्यान, संस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून बंद असलेला खते व बी बियाणे खरेदी विक्रीचा व्यवसाय सहकार कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यात आला असून या उपक्रमाला शेतकऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून पशुखाद्य केंद्र तसेच साखर विक्री केंद्रही सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सभापती किरण हुलावळे व उपसभापती सुनीता केदारी यांनी सांगितले.

खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या माध्यमातून बी बियाणे, खत विक्री सह इतर शेती पूरक व्यवसायही सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे तसेच आमदार सूुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी भवनच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुसज्ज अशी हक्काची वास्तू लवकरच उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. – किरण हुलावळे, सभापती

अजित दादा पवार यांचे मावळ तालुक्यावर विशेष प्रेम होते, मावळचा आमदार करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मावळ तालुक्याला भरभरून निधी देऊन आपला शब्द पूर्ण केला. या माध्यमातून मावळ तालुक्याचा गतिमान विकास झाला असून त्यांचे योगदान लक्षात घेता शेतकरी भवनला दादांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. – गणेश विनोदे, संचालक

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
– विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
– लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास


dainik maval jahirat

Previous Post

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.