Dainik Maval News : मागील महिना दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.
जून व जुलै महिन्यातील सुरुवातीच्या काही सरींवर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर दमदार पाऊस न झाल्याने पिके पाण्याअभावी करपून चालली आहेत.
ज्या भागात सोयाबीनची शेती होते, तिथे पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन शेंगा भरण्याच्या अत्यंत निर्णायक टप्प्यात असताना जमिनीतील ओलावा संपला आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी सोयाबीन पूर्णपणे वाळू लागले आहे.
मूग पिकालाही या दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका बसला असून, बियाणे, खते, मशागत आणि मजुरीसाठी झालेला खर्चही निघणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
दुष्काळी परिस्थितीचा फटका तालुक्यातील मोसंबी आणि डाळिंब बागांनाही बसत असून, ओलावा नसल्यामुळे फळांचा आकार आणि प्रतवारी ढासळण्याची चिंता उत्पादकांना लागली आहे.
मावळातील काही भागात तूर सह सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. कमी मशागत व कमी खर्चात येणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचा कल सोयाबीन आणि तूर पिकाकडे वाढला आहे. हे पीक फायदेशीर ठरत असल्यानेच यंदा लागवड क्षेत्र वाढले आहे, परंतु पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे.
मागील वर्षीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नाही. त्यातच यंदा किडींच्या थैमानामुळे तूर उत्पादन धोक्यात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि योग्य फवारणीबाबत मार्गदर्शन करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्र्यांनी केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ
– मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला
– शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक
