Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या हस्ते (1 ऑक्टोबर) सहा नवीन घंटागाडी व एक सेप्टिक टँक गाडींचे पूजन करून शहरवासीयांच्या सेवेत या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
वडगाव कचरा संकलन व्यवस्थापनासाठी शहरातील स्वच्छतेकरिता वडगाव नगरपंचायतीने नेमलेले नवीन ठेकेदार (VDK Enterprises) यांच्या नवीन सहा गाड्या दाखल होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे शहरातील कचरा संकलन होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
सदर सहा घंटागाड्या शहरातील विविध प्रभागांमधील घरगुती कचरा दररोज नियोजित वेळेत गोळा करून कचरा व्यवस्थापन प्रक्रिया अधिक गतिमान व स्वच्छ करण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच सेप्टिक टँक गाडीद्वारे शहरातील सेप्टिक टँक साफसफाईची सेवा आता नागरिकांना नगरपंचायतमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याप्रसंगी नगरपंचायतीच्या नगरसेविका सुनिता राहुल ढोरे, नगरसेवक अनंता कुडे, आरोग्य अधिकारी संपत पवार, दिगंबर बांडे, व्हिडीके इंटरप्रायझेस चे सुपरवायझर आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ
– मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला
– शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक
