Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक, व पवन मावळ विभागात असलेल्या किल्ले तिकोना उर्फ वितंडगडावर येणारे पर्यटक व शिवभक्त यांना तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑनलाईन ऑडीओ बुकचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
तिकोनागडाची माहिती करून देण्याकरीता गडावर क्यूआर कोड बसवण्यात आले आहेत. हे क्यूआर कोड स्कँन केल्यावर यू ट्युब उघडला जाऊन गडाची माहिती चालू होते. ११ मिनीट ४४ सेकंदाची व्हिडिओ द्वारे गडाची माहिती ही गडावर येणाऱ्या पर्यंटक व शिवभक्त यांच्या पर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न करण्यात करण्यात आला आहे. या द्वारे २४ तास माहिती उपलब्ध होणार आहे.
ट्री आय फाऊंडेशन आणि नेट क्रैकर टेक्नॉलॉजी (Netcracker Techonology) यांनी याची निर्मिती केली असुन भविष्यात गडावर आणखी कोणत्या माध्यमातून माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करता येईल याचा विचार करण्यात येत आहे. यावेळी तन्वीर इनामदार, प्रिया जोशी, सुहास गाडेकर, विनोद गोरे, अभिजीत पाटील, नितीन भागवत, पुष्पल कुंभारे, संतोष साबळे, किरण चिमटे आदी उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले
– “स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम
– मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली
