व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, November 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संविधान दिनानिमित्त गुरुवारी किल्ले लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान ; राज्यघटनेच्या उद्देशिकेचे होणार सामूहिक वाचन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले संवर्धन व स्वच्छता अभियानाचे लोकार्पण

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 26, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Lohagad-Fort

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : संविधान दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) राज्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले संवर्धन व स्वच्छता अभियानाचे’ लोकार्पण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड, शिवनेरी आणि लोहगड या तीन किल्ल्यांवर गुरुवारी सकाळी ९ वाजता एकाच वेळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जतन करण्याबरोबरच गडकिल्ल्यांवरील स्वच्छता, पर्यावरणाचे रक्षण आणि पर्यटनस्थळांबाबत नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांना भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून शपथ देण्यात येणार आहे. संविधानातील मूल्यांचा जागर करतानाच ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.

महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले ही राज्याची महत्त्वाची सांस्कृतिक संपत्ती आहे. या वारशाचे जतन करणे, किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता राखणे तसेच पर्यटकांनीही स्वच्छतेचे नियम पाळून या ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य आणि पर्यावरण अबाधित ठेवणे आवश्यक आहे. या दृष्टीने अभियानाच्या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lohagad-Fort

संविधान दिनानिमित्त गुरुवारी किल्ले लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान ; राज्यघटनेच्या उद्देशिकेचे होणार सामूहिक वाचन

November 26, 2026
4726 farmers in Pune district selected for farm ponds 91 farmers in Maval taluka

पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

November 26, 2026
Overwhelming response from women to Ajit Jansamvad Vikas Abhiyan in Maval taluka

मावळमध्ये अजित जनसंवाद विकास अभियानाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 26, 2026
meeting regarding rehabilitation of Pavana Dam affected farmers closed pipeline project

पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन आणि बंदिस्त जलवाहिनी याबाबत २६ नोव्हेंबरला मंत्रालयात पुन्हा बैठक ; रविंद्र भेगडे यांची माहिती

November 25, 2026
fund sanctioned for setting up new bus stop in Maval taluka MLA Sunil Shelke expresses gratitude

मावळ तालुक्यात अत्याधुनिक बस थांबे उभारण्यासाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांनी मानले राज्य सरकारचे आभार

November 25, 2026
Villagers of Shirde Jambhavli maval rise up against Tata company chants of Tata go back

टाटा कंपनीविरोधात शिरदे-जांभवली ग्रामस्थांचा एल्गार! ‘टाटा गो बॅक’च्या घोषणांनी परिसर दणाणला

November 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.