व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

होय…तो परत फिरलाय! मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, महाराष्ट्राबाबत स्थिती काय? जाणून घ्या

आता खऱ्या अर्थाने मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असल्याचे भारतीय हवामान विभागाने मंगळवारी (20 सप्टेंबर) रोजी जाहीर केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 21, 2022
in देश-विदेश, महाराष्ट्र
Monsoon-Rains

Photo Courtesy : Facebook / Sanjay Zinjad


मान्सूनच्या परतीचा प्रवास ( Return Journey Of Monsoon ) आता खऱ्या अर्थाने सुरु झाला असून राजस्थानमधून ( Rajastan ) नैऋत्य मोसमी पाऊस ( Southwest Monsoon ) माघारी फिरण्यास सुरुवात झाल्याचे भारतीय हवामान विभागाने ( Department Of Meteorology ) मंगळवारी (20 सप्टेंबर) रोजी जाहीर केले. तसेच, महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस माघारी फिरेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा मान्सूनने 29 मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर सर्वांत शेवटी 2 जुलै रोजी पश्चिम राजस्थानच्या भागात प्रवेश करून संपूर्ण देश व्यापला होता. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे यंदा मान्सूनचा सर्वाधिक लाभ हा मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांना मिळाला. मात्र, उत्तर आणि ईशान्य भारतातील काही भागांना पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्रात यंदा मात्र सर्वच जिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली. देशात यंदा सरासरीच्या तुलनेत 7 टक्के अधिक, तर महाराष्ट्रात 26 टक्के अधिक पावसाची नोंद झालेली आहे.

राजस्थानमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास हा साधारण 17 सप्टेंबरच्या आसपास असतो. यंदा तो तीन दिवस उशिराने परत फिरताना दिसत आहे. राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याचा प्रवास 10 ते 15 दिवसांनी होतो. त्यानुसार महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाचा परतीचा प्रवास होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होत असतानाच सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रामुख्याने विदर्भात काही भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ( The Return Journey Of Monsoon Rains Begins Department Of Meteorology )

अधिक वाचा –
मावळ तहसील कार्यालयाकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत ‘महासेवा मेळावा’
थेट तोडगा! आमदार शेळकेंचे सहकार्य आणि नगराध्यक्ष ढोरेंचे प्रयत्न, वडगावचा पाणी पुरवठा होणार सुरळीत


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तहसील कार्यालयाकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत ‘महासेवा मेळावा’

Next Post

विशेष लेख : कॉमेडियन राजू श्रीवास्तव याचे निधन… राजू गेला… पण जाता जाता खुप काही शिकवून गेला!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Raju-Shrivastava-Passes-Away

विशेष लेख : कॉमेडियन राजू श्रीवास्तव याचे निधन... राजू गेला... पण जाता जाता खुप काही शिकवून गेला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.