व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ताब्यात घ्यायला आलेल्या पोलिसावर हल्ला करत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल

एका आरोपीला गुन्ह्याच्या तपासात ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर आरोपीने ब्लेडने हल्ला करुन स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार घडलाय.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 24, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आरोपीला गुन्ह्याच्या तपासात ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर आरोपीने ब्लेडने हल्ला करुन स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार घडलाय. याप्रकरणी फिर्यादी संतोष रामदास काळे (वय 35, व्यवसाय-नोकरी, रा. आराध्या बिल्डींग, देहुगाव, ता हवेली जि पुणे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानुसार आरोपी जलसिंग राजपुतसिंग दुधानी (वय 35, रा. हल्ली जांभुळगाव, ता मावळ जि पुणे) याच्यावर देहुरोड पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 353, 309, 352, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सव्वा तीन वाजताच्या सुमारास मुंबई पुणे जुना हायवे रोडवर सेंट्रल चौक देहुरोड इथे हा संपूर्ण प्रकार घडला. ( Accused Attacked Policeman Who Came To Arrest Him And Tried To Commit Suicide Himself Case Registered In Dehu Road Police )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महाळुंगे पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर 19/2023 भादवि कलम 454, 380, 34 या गुन्ह्याच्या तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी जलसिंग राजपुतसिंग दुधानी याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस अधिकारी संतोष रामदास काळे हे सेंट्रल चौक देहुरोड इथे आले होते. तेव्हा काळे यांनी फिर्यादीला पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून कायदेशीर ताब्यात घेत असताना आरोपी जलसिंग याने शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी आणि स्वतःची अटक टाळण्यासाठी जाणीवपूर्वक काळेंच्या अंगावर धावून जात त्यांना धक्का देवून स्वतः जवळील ब्लेड हातामध्ये घेऊन काळेंच्या चेहऱ्यावर मारण्याचा प्रयत्न केला.’

तसेच, “‘मला पकडले तर तुम्हाला दाखवितो, मी आत्महत्या करतो’ असे बोलून स्वतःच्याही हातावर ब्लेडने वार करुन घेतले”, असे फिर्यादीत नमुद आहे. या प्रकारांत आरोपी जलसिंह दुधानी जखमी झाल्याने त्याला पुणे इथे ससून रुग्णालयात एडमिट करण्यात आले आहे. तसेच सदर प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस सब इन्सपेक्टर थिटे हे करत आहेत.

अधिक वाचा –

– रस्त्यावर खडी टाकल्यामुळे वाद, 70 वर्षीय वृद्धावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न, बेबडओहळ येथील धक्कादायक प्रकार!
– क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत माऊ गावातील गरीब कुटुंबाचा संसार जळून खाक


dainik maval jahirat

Previous Post

रस्त्यावर खडी टाकल्यामुळे वाद, 70 वर्षीय वृद्धावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न, बेबडओहळ येथील धक्कादायक प्रकार!

Next Post

सहप्रवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ST-Bus-Crime

सहप्रवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.