व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बालपण समृद्ध करणारी, चिऊताई…! तुझ्यासाठी दोन ओळी । World Sparrow Day

दिनांक 20 मार्च हा दिवस आपण जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा करतो.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 20, 2025
in मावळकट्टा, देश-विदेश, महाराष्ट्र
Sparrow-Chimani

Photo - Twitter


Dainik Maval News : प्रत्येकाच्या बालपणापासूनची संगत असणारी चिऊताई हळूहळू नामशेष होताना दिसू लागली आणि ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन 2010 सालापासून 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा करण्याल सुरुवात झाली.

चिऊताई… जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचीच ती बहीण. तीच्या कविता, गाणी, गोष्टी ऐकत बोलत आपण सर्व मोठे झालो. मात्र, कालपरत्वे हाडामासांच्या नात्यात तिचं अस्तित्व कमी होत गेलं. आता मात्र आपल्या या ताईच्या जीवनमरणाचाच प्रश्न निर्माण झालाय. खरं तर तीने कधी कुणाला त्रास दिला नाही, किंबहुना ती देतही नाही. आपण कुणाच्या वाटे जाऊ नये आणि आपल्या कुणी, हाच तिचा स्वभाव.

एरवी माणसाने साधा तिला स्पर्श जरी केला, तरी तीला कळपात राहणं मुश्किल, त्यामुळे तिचं धोरण नेहमी अलिप्तपणाचं किंवा तिच्या कळपातलं. माणसाला मात्र तिच्या वेग आणि रंगाचं नेहमीच आकर्षण राहिलं. त्यातूनच तिचं सदैव कौतूक. तिनेही मग कथा, गाण्यातून त्याची परफेड केलीच. तरीही आज तिच्या अस्तित्वाचा प्रश्न का उभा ठाकला असावा बरं..? ( World Sparrow Day 20th March Chimani Divas )

एकेकाळी गावागावांत चिमण्यांचा थवा दिसून यायचा. हल्ली ते प्रमाणही कमी झालंय. खरंतर माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी ओळख असलेली चिमणी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. माणसांच्या बदलत्या जिवनशैलीत, ना आता चिमणीसाठी अंगण राहिलंय, ना घराभोवती झाडं आहेत, ना वळचणी.. त्यामुळे आपल्या घरांमध्ये तिच्या घरट्यासाठी छोटीशी जागाही उपलब्ध होत नाही, हे वास्तव आहे.

त्यामुळेच जागतिक चिमणी दिवस याची गरज सर्वांनीच समजून उमजून घेत हा दिवस साजरा करायला हवा. जागतिक चिमणी दिनी नागरिकांनी चिमणी वाचवण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील महत्त्व समजावून घेणे आणि इतरांना सांगणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे, अशा प्रकारचे कार्यक्रम वैयक्तिक आणि संस्थात्मक स्तरावर करणे आवश्यक आहे. आणि फक्त 20 मार्चच नाही तर चिऊताईच्या रक्षणासाठी कायमस्वरुपी जनजागृती करणे गरजेचे आहे.

लेख – संपादकीय (दैनिक मावळ)

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई


Previous Post

कार्ला गावातील अशोक हुलावळे तीन महिन्यांपासून बेपत्ता । Karla News

Next Post

मावळ मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसांत बैठक ; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची ग्वाही । Maval Lok Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Meeting to resolve pending railway issues in Maval constituency Union Railway Minister assures

मावळ मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसांत बैठक ; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची ग्वाही । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.