भारतीय जनता पार्टी ( Bharatiya Janata Party ) मावळ तालुका ( Maval Taluka ) मासिक बैठक ( Monthly Meeting ) पक्ष कार्यालय वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) येथे शनिवार (1 ऑक्टोबर) रोजी संपन्न झाली. भाजपा मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे ( BJP Maval President Ravindra Bhegade ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मोठ्या संख्येने तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रविंद्र भेगडे यांनी यावेळी, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत केलेल्या कार्याचा आढावा घेऊन येणाऱ्या काळात करावयाच्या ‘धन्यवाद मोदीजी अभियान’ ( Thank you Modiji Abhiyan ) संदर्भात सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना माहिती देऊन मार्गदर्शन केले.
सदर बैठकीला तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे, PMRDA सदस्य कुलदीप बोडके, चंद्रकांत गायकवाड, गणेश ठाकर, गणेश कल्हाटकर, हरिभाऊ दळवी, गण अध्यक्ष सूर्यकांत सोरटे, कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे, सचिन काजळे, सरपंच ज्ञानेश्वर गुंड, किसन गुंड, लहू गुंड, दत्ता खेंगले, सारिका शिंदे, विठ्ठल तूर्डे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( BJP Maval Taluka Monthly Meeting Concluded At Vadgaon By Ravindra Bhegde Thank you Modiji Abhiyan )
अधिक वाचा –
तळेगाव दाभाडे येथे मावळ कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम पूर्वतयारी कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबिर
भाजपाची हाक, चलो वडगाव..! ‘या’ कारणासाठी महाविकासआघाडी विरोधात मावळ भाजपचा निषेध मोर्चा
महायुतीचा बेधडक मोर्चा : ‘आम्ही कालही कामगारांसोबत होतो, आजही आहोत आणि उद्याही असू’ – रविंद्र भेगडे