वडगावचे माजी सरपंच तसेच मावळ तालुका देखरेख सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष पोपटराव मारुतराव वहिले यांची राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका जेष्ठ नागरिक सेलच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे व राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे तालुका अध्यक्ष विष्णू शिंदे यांच्या हस्ते वहिले यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे, देहूरोड राष्ट्रवादी काँ. मा. अध्यक्ष एॅड. कृष्णा दाभोळ, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, वडगाव शहरचे अध्यक्ष प्रवीण ढोरे, रणजीत हिंगे, राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले, निरंजन बोत्रे, विराज वहिले सह पदाधिकारी उपस्थित होते.
पोपटराव वहिले हे वडगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सलग 15 वर्ष चेअरमन होते. मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे व सर्व पदाधिकारींनी वहिले यांचे अभिनंदन केले. ( popatrao wahile apointed as an adviser to senior citizen cell of NCP maval )
अधिक वाचा –
– उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांनो सावधान! थेट कारवाई होणार, सायली म्हाळसकर ‘इन अॅक्शन मोड’
– कौतुकास्पद.! आजिवली येथील ज्ञानेश्वर विद्या निकेतनचा दहावीचा निकाल 96 टक्के; शुभम राऊत 89 टक्के गुणांसह प्रथम