व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमधील ‘मावळ फेस्टिवल’ कार्यक्रमाला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती! Maval Festival

वडगाव येथील मावळ फेस्टिवल ग्रुपच्यावतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित मावळ फेस्टिवलचे उद्‍घाटन (शनिवारी, दि. 27) राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मान्यवरांच्या हस्ते झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 28, 2024
in मावळकट्टा, लोकल, शहर
Dhananjay-Munde-in-maval-taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव येथील मावळ फेस्टिवल ग्रुपच्यावतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित मावळ फेस्टिवलचे उद्‍घाटन (शनिवारी, दि. 27) राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मान्यवरांच्या हस्ते झाले. ‘कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात मावळचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून आणि त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याचा मावळ फेस्टिवलचा उपक्रम अभिनंदनीय आहे,’ असे गौरवोद्‍गार मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी काढले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळचे आमदार सुनिल शेळके हे होते. तर, देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी उपसभापती गणेश ढोरे, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष साहेबराव काशीद, अमोल बुचडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी नगराध्यक्ष मयुर ढोरे, मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम, सुनील ढोरे, विलास काळोखे आदीजण यावेळी उपस्थित होते. ( Agriculture Minister Dhananjay Munde attended Maval Festival program in Vadgaon )

  • मंत्री मुंडे व आमदार शेळके यांच्या हस्ते श्रीराम कला पथक (पवळेवाडी) यांना सांस्कृतिक पुरस्कार व एकवीरा जोगेश्वरी दुर्गा परमेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समिती (कार्ला) यांना सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बैलगाडा शर्यतीचा राजा-मावळ किंग ‘ओम्या’ याचा विशेष सत्कार करण्यात आला. ओम्याचे मालक रामनाथ वारिंगे यांनी पुरस्कार स्वीकारला. मावळ फेस्टिवलच्या डायलिसिस सेंटर या नियोजित प्रकल्पाची घोषणा यावेळी करण्यात आली. फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश जांभूळकर यांनी स्वागत केले. संस्थापक प्रवीण चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. भूषण मुथा यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम प्रमुख विनायक भेगडे यांनी आभार मानले.

“वडगाव हे कला व क्रीडा संस्कृतीचे केंद्र आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांना सामावून घेण्याच्या मावळ फेस्टिवलच्या धोरण स्वागतार्ह आहे. मावळ फेस्टिवलच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी तालुक्यातील नागरिकांना मिळत आहे. तसेच मागील सोळा वर्षांपासून अखंडपणे सांस्कृतिक चळवळ पुढे चालवली जात आहे. त्यामुळे मावळची सांस्कृतिक नगरी अशी ओळख निर्माण होत आहे.” – आमदार सुनिल शेळके

अधिक वाचा –
– पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा ब्लॉक! ‘या’ 12 लोकल गाड्या रद्द, पाहा यादी । Block on Pune Lonavala Railway Route
– श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सांबर हरणाचा जीव वाचवण्यात प्राणीमित्रांना यश, मावळमधील नेसावे येथील घटना । Maval News
– दुःखद! तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गोपाल परदेशी यांचे आकस्मिक निधन, परिसरात शोककळा


dainik maval jahirat

Previous Post

वरसोली ग्रामपंचायतीत महिलांसाठी ‘आस्मिता भवन’, ग्रामस्वच्छतेसाठी प्रत्येक घरात डसबीनचे वाटप । Maval News

Next Post

लेकाच्या लग्नात वरमाईची सोने आणि पैशाने भरलेली बॅग लंपास, सोमाटणे येथील घटना, अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल । Maval Crime News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

लेकाच्या लग्नात वरमाईची सोने आणि पैशाने भरलेली बॅग लंपास, सोमाटणे येथील घटना, अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल । Maval Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Review meeting regarding Lonavala flood situation MLA Sunil Shelke directs the administration

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

July 11, 2026
Collector has issued orders to halt traffic through Dudhivare Pass in Pawan Maval region

मोठी बातमी ! पवन मावळातील प्रसिद्ध दुधीवरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 11, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

July 11, 2026
Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

July 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.