व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

मावळच्या गावखेड्यातील कामे रखडली; 'हे गटविकास अधिकारी नकोच'

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 15, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आठ दिवसांच्या रजेवर गेलेले मावळचे गटविकास अधिकारी तब्बल अडीच महिन्यांनी परत आल्याने, मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू न देण्यासाठी (दि.१४) सकाळपासूनच बीडीओ कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी अखेर गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे लावले. ‘हे बीडीओ नकोच’ अशी ठाम भूमिका लोकप्रतिनिधींनी यावेळी घेतली.

याप्रसंगी सभापती सुनीता येवले, उपसभापती साहेबराव कारके, जिल्हा परिषद सभापती दीपाली हुलावळे, पं.स. गटनेते दिलीप ढोरे, जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, अनंता पावशे, पल्लवी दाभाडे, मनीषा मुऱ्हे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र कडलक, योगेश लोहोर, रेश्मा देवकर, शैला कालेकर, प्राची गायकवाड, आशा मोरमारे आदी उपस्थित होते.

मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान हे सुमारे अडीच महिन्यांपासून रजेवर असून, त्यांच्या जागी सहायक गटविकास अधिकारी सेवक थोरात हे प्रभारी म्हणून कारभार पाहत आहेत. दरम्यान, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे नवीन पदाधिकारी (सदस्य) निवडून आल्यावर अवघ्या दोन महिन्यांतच गटविकास अधिकारी प्रधान हे रजेवर गेले होते.

मंगळवारी (दि.१४) अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर गटविकास अधिकारी पंचायत समितीमध्ये पूर्ववत रुजू होणार असल्याचे समजले होते. त्यानुसार, त्यांना खुर्चीवर बसू द्यायचे नाही, या उद्देशाने सकाळी ९ वाजलेपासूनच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी पंचायत समितीमध्ये दाखल झाले. सकाळी १०.३० वाजेपर्यंत गटविकास अधिकारी प्रधान यांची वाट पहिली, अन त्यानंतर मात्र त्यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.

केवळ ८ दिवसांच्या रजेवर जातो म्हणून गेलेले गटविकास अधिकारी प्रधान हे तब्बल अडीच महिने रजेवर असून, प्रशासकीय कालावधीत नियमित हजर राहणारे अधिकारी, लोकनियुक्त प्रतिनिधींचा कारभार सुरू झाल्यानंतर मात्र कामात टाळाटाळ करत असल्याने, हे गटविकास अधिकारी नकोच, अशी भूमिका सर्व लोकप्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक


dainik maval jahirat

Previous Post

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

Next Post

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.