व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

खासदार श्रीरंग बारणे यांचे विद्युत विभागाच्या सचिवांना साकडे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 25, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करावा, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय विद्युत मंत्रालयाच्या सचिवांकडे केली. त्यावर खासगी कंपनीशी चर्चा करुन फेरसर्व्हे करण्यात येणार असून त्यानुसार वीज वाहिनीत बदल करण्याची ग्वाही सचिवांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून विकसित झालेला पॅराग्लायडिंग हिल हा क्रीडा प्रकार कायमस्वरुपी सुरु राहील, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

Novel NIBR Ads

कामशेत येथील प्रस्तावित वीज वाहिन्यांच्या पोलमुळे पॅराग्लायडिंग हिलला अडथळा निर्माण होणार होता. याबाबत कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय एम राव, उपाध्यक्ष विनोद शेलार यांनी खासदार बारणे यांची भेट घेऊन वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी केली होती. त्यावर खासदार बारणे यांनी केंद्रीय विद्युत मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल यांची भेट घेतली. तीन खांबासाठी ३० वर्षांपासून चालू असलेला पॅराग्लायडिंग हा क्रीडा प्रकार बंद करणे चुकीचे आहे. पोल बाजूने घेता येऊ शकतात, असे सांगितले. त्यावर अग्रवाल यांनी खासगी कंपनीशी चर्चा करुन फेरसर्व्हे करावा. पोल बाजूने घेऊन जावेत, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

खासदार बारणे म्हणाले, पॅराग्लायडिंग हिल हा नवीन क्रीडा प्रकार आहे. कामशेत परिसर राष्ट्रीय स्तरावरील विमान क्रीडा केंद्र, पर्यटन स्थळ आणि ग्रामीण रोजगाराचा महत्त्वाचा आधार आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासाला आणि ऊर्जा गरजांना पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, प्रस्तावित मार्ग मुख्य उड्डाण क्षेत्रातून जात असल्याने गंभीर सुरक्षेचा धोका निर्माण होत असून, गेल्या ३० वर्षांपासून विकसित झालेल्या क्रीडा आणि स्थानिक आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन दशकांपासून कामशेत हे भारतातील प्रमुख पॅराग्लायडिंग स्थळ म्हणून ओळखले जाते. येथे मनोरंजनात्मक उड्डाणे, व्यावसायिक टँडम उड्डाणे, वैमानिक प्रशिक्षण तसेच स्पर्धात्मक विमान क्रीडा उपक्रम चालतात. भौगोलिक स्थान, डोंगररचना, उंची आणि अनुकूल वाऱ्याच्या परिस्थितीमुळे हे स्थळ अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे वर्षातील जवळपास आठ ते नऊ महिने उड्डाणाची संधी उपलब्ध असते.

देशभरातील वैमानिक घडवण्यासाठी हे एक महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे. या स्थळाने भारतातील पॅराग्लायडिंग समुदाय विकसित करण्यात आणि सुरक्षित उड्डाण पद्धती निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कामशेतमध्ये पॅराग्लायडिंग भोवती गेल्या अनेक वर्षांत एक मजबूत स्थानिक व्यवस्था विकसित झाली आहे. पॅराग्लायडिंग प्रशिक्षण संस्था निर्माण झाल्या आहेत.

Novel NIBR Ads

प्रस्तावित वीजवाहिनी मार्गात कामशेत पॅराग्लायडिंग हिल जवळील प्रस्तावित ७६५ केव्ही वीजवाहिनीचे मार्ग दर्शविले आहेत. सध्याचा प्रस्तावित मार्ग मुख्य उड्डाण क्षेत्र आणि वैमानिक वापरत असलेल्या उड्डाण मार्गावर परिणाम करतो. हा परिसर मोकळी जमीन नसून, गेल्या अनेक दशकांपासून प्रशिक्षण, सुरक्षित उड्डाण, पर्यटन आणि रोजगारासाठी विकसित झालेले सक्रिय विमान क्षेत्र आहे. उड्डाण क्षेत्रापासून दूर मार्गामध्ये बदल केल्यास पायाभूत सुविधा विकास आणि या महत्त्वपूर्ण क्रीडा स्थळाचे संरक्षण दोन्ही शक्य आहे.

नकाशानुसार प्रस्तावित मार्गामध्ये असे तीन टॉवर आहेत. ज्यांचा परिणाम उड्डाण क्षेत्रावर होणार असून, हे साधारण दोन किमी लांबीच्या वीजवाहिनी क्षेत्रात येतात. त्यामुळे वीजवाहिनीच्या मार्गाचा पुनर्विचार करावा. ऊर्जा, पर्यटन, क्रीडा विभाग, स्थानिक प्रशासन आणि विमान क्रीडा प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीचे आयोजन करावे. मुख्य उड्डाण क्षेत्राला टाळणारा सुधारित पर्यायी मार्ग निश्चित करावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. त्याला सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

Next Post

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.