व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात ! अनियंत्रित ट्रेलरसह सात वाहनांचा अपघात ; दोन महिला ठार, पाचजण जखमी । Accident On Mumbai Pune Expressway

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज, शनिवारी (दि. 24) भीषण अपघात झाला असून यात जीवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 24, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Seven vehicles collide Two women killed five injured

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज, शनिवारी (दि. 24) भीषण अपघात झाला असून यात जीवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. एक्सप्रेस वेवर दुपारी चारच्या सुमारास किलोमीटर 37 म्हणजे खोपोली फुडमॉलच्या नजीक मुंबई मार्किकेवर हा अपघात झाला. अपघातात दोन महिला ठार झाल्या असून पाच जण जखमी झाले आहेत. सोबत वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

शनिवार असल्याने एक्सप्रेस वेवर वाहनांची संख्या अधिक होती. दरम्यान एक्सप्रेस वेवरील किलोमीटर 37 दरम्यान दुपारी चारच्या सुमारास वाहतूक काही कारणाने थांबली होती, त्याचवेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक ट्रेलर भरधाव वेगाने आला. त्या ट्रेलरने अगोदर एका इर्टिगा कारला धडक दिली. नंतर सियाझ कार, ह्युंदायी कार आणि बसला जोरदार ठोकर दिली. नंतर एका स्विफ्ट कारला पाठीमागून ठोकर दिली, तेव्हा स्विफ्ट कार समोरील बसला जाऊन धडकली. ही कार बसच्या पाठीमागील केबिनमध्ये घुसली, ज्यामुळे आतील प्रवासी गंभीर जखमी झाले.

  • समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातात स्विफ्ट चालक आणि दोन महिला गंभीर जखमी झाल्या. परंतु कारमधील एक महिला अश्विनी अक्षय हळदणकर (अंदाजे 30) आणि एक सतरा वर्षीय मुलगी श्रेया संतोष अवताडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, वसुधा विजय जाधव (रा. कोल्हापूर), सारिका अवताडे (रा. घाटकोपर), सारिका विजय जाधव (9 वर्षे), अविनाश विजय जाधव (3 वर्षे) राहणार कोल्हापूर आणि अक्षय हळदणकर हे सर्व जखमी झाले आहेत.

अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच, महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा, देवदूत यंत्रणा, खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देताना प्रमाणित कार्य पद्धतीचा (एसओपी ) अवलंब करावा

Next Post

वडगाव मावळ : गोरक्षकांच्या मदतीने ४७ गायी, २९ वासरांची सुटका । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Maval 47 cows 29 calves rescued with the help of cow vigilantes

वडगाव मावळ : गोरक्षकांच्या मदतीने ४७ गायी, २९ वासरांची सुटका । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.