व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, January 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ : गोरक्षकांच्या मदतीने ४७ गायी, २९ वासरांची सुटका । Vadgaon Maval

या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून सुमारे ८७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 25, 2025
in लोकल, शहर
Vadgaon Maval 47 cows 29 calves rescued with the help of cow vigilantes

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव फाटा येथे वडगाव पोलिसांनी स्थानिक गो रक्षकांच्या मदतीने कारवाई करून पाच वाहनांमध्ये दाटीवाटीने भरून कत्तलीसाठी चालविलेल्या ४७ गायी व २९ वासरांची सुटका केली. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून सुमारे ८७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.

महेश साबळे (वय २४), शिवाजी निवडुंगे (वय २४, दोघेही रा. रुपीनगर, तळवडे), पप्पू शेख (वय ३८, रा. मेथवडे, ता.सांगोला, जि. सोलापुर), मगर सूर्यवंशी (वय ३९, रा. आदर्शनगर, मामुर्डी, ता. हवेली, पुणे), दयानंद तारडे (वय २५, रा.समता कॉलनी, वराळे, ता. मावळ), नीतेश उघडे (वय २८, रा. वरवटी, जि. बीड), श्रीकांत गरड (वय ४८), नेताजी लोमटे (वय ३६), पवन लोमटे (वय ४८, तिघेही रा. खेड, जि.धाराशिव) व रामराव देशमुख (वय ५२, रा. घोडकी, ता.वाशी, जि.धाराशिव) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

  • वडगावचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री स्थानिक गो रक्षकांकडून माहिती मिळाली की, वडगाव फाटा येथे आरोपी हे पाच टेंपोंमधून सुमारे ४७ गायी व २९ वासरे दाटीवाटीने भरून त्यांना श्वास घेता येणार नाही व हवा लागणार नाही अशा रीतीने रस्सीने बांधून तसेच त्यांच्या चारा पाण्याची व औषधांची कोणतीही व्यवस्था न करता क्रूरपणे कत्तलीसाठी वाहतूक करत आहेत.

यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या स्थानिक गोरक्षकांच्या मदतीने ही वाहने व जनावरे ताब्यात घेऊन दहा जणांविरोधात महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आशिष काळे पुढील तपास करत आहेत. सुटका करण्यात आलेल्या सर्व गायी व वासरे ही नायगाव आणि आर्डव येथील गोशाळेत जमा करण्यात आली आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


Previous Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात ! अनियंत्रित ट्रेलरसह सात वाहनांचा अपघात ; दोन महिला ठार, पाचजण जखमी । Accident On Mumbai Pune Expressway

Next Post

इंद्रायणी आणि पवना नदी संवर्धनासाठी राज्य सरकार कटीबद्ध ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indrayani river at Kamshet

इंद्रायणी आणि पवना नदी संवर्धनासाठी राज्य सरकार कटीबद्ध ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांना भाजपाकडून कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटाची अधिकृत उमेदवारी ; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

January 23, 2026
name of BJP official candidate Ashatai Waikar is in news in Karla-Khadkala Zilla Parishad group

कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !

January 23, 2026
NCP opens campaign rally in Induri-Varale group Voters respond enthusiastically to campaign rally

राष्ट्रवादीने इंदुरी-वराळे गटात फोडला प्रचाराचा नारळ ! नवलाख उंबरे गावात प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

January 23, 2026
Bajaj Pune Grand Tour 2026 Luke Madgwe dominates Mulshi-Maval stage Harshveer Singh best Indian cyclist

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : मुळशी–मावळ टप्प्यात ल्यूक मडग्वेचे वर्चस्व ; हर्षवीर सिंग सर्वोत्तम भारतीय सायकलपटू

January 22, 2026
Dharatirth Gadkot Mohim in Maval taluka after 23 years It will start on 23rd January

मावळ तालुक्यात तब्बल २३ वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम ! २३ जानेवारीला होणार आरंभ

January 22, 2026
BJP NCP face to face while filing nomination papers MLA Sunil Shelke criticizes BJP leaders Maval

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा – राष्ट्रवादी आमनेसामने ! आमदार सुनील शेळके यांची भाजपा नेत्यांवर सडकून टीका

January 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.