“अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविषयी प्रक्षोभक वक्तव्य करुन जाती जातीमध्ये तेढ निर्माण केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध मराठा समाजाची बदनामी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मोर्चा, मावळ तालुका यांनी पोलिस निरिक्षक वडगाव मावळ आणि तहसिलदार वडगाव मावळ यांच्याकडे केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांनी मोठे जनआंदोलन उभारलेले आहे. त्यात सरकार आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते यांच्यात बोलणी चालू आहे. असे असताना महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार मराठा समाज आणि इतर समाजाच्या लोकांमध्ये जातीय वाद निर्माण होतील. अशी प्रक्षोत्रक आणि बेताल वक्तव्ये करून महाराष्ट्र राज्यामधील सामाजिक वातावरण दुषित करून त्याद्वारे जाती जातीमध्ये भांडण तंटे अथवा जातीय दंगली अशी परिस्थिती निर्माण करत आहे. याबाबत मराठा समाजाच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात येऊन अशाप्रकारचे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे आणि मराठा समाजाची बदनामी केल्याबाबत छगन भुजबळ यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा” अशी मागणी तक्रार अर्जात कऱण्यात आली आहे. ( file case against chhagan bhujbal maratha kranti morcha lodged complaint in vadgaon maval police )
अधिक वाचा –
– आगामी निवडणूकांसाठी काँग्रेसचा ‘एल्गार’! आमदार रवींद्र धंगेकरांचा मावळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘कानमंत्र’
– आमदार सुनिल शेळकेंना कलाकार चाहत्याकडून भन्नाट गिफ्ट; भेट पाहून ‘आण्णा’ही भावूक
– वडगाव शहरात भाजपातर्फे मतदार नोंदणी अभियान; पाहा शहरात कधी आणि कुठे होणार शिबिर?