आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील 11 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची गुन्हे शाखा, विशेष शाखा, तसेच वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. मागील महिन्याभरापासून टप्प्याटप्प्याने ह्या बदल्या होत आहेत. अगोदर उपायुक्त, सहायक आयुक्त, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर आता निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बदली झालेले वरिष्ठ निरीक्षक –
गणेश जवादवाड (वाकड ठाणे ते गुन्हे शाखा), कृष्णदेव खराडे (शिरगाव ठाणे ते विशेष शाखा), अमरनाथ वाघमोडे (रावेत ठाणे ते गुन्हे शाखा), शंकर अवताडे (तळेगाव दाभाडे ठाणे ते गुन्हे शाखा), संजय तुंगार (तळेगाव एमआयडीसी ठाणे ते सायबर सेल), अशोक कदम (चाकण ते गुन्हे शाखा), राम राजमाने (पिंपरी ठाणे ते विशेष शाखा), वसंत बाबर (म्हाळुंगे एमआयडीसी ठाणे ते गुन्हे शाखा, श्रीराम पौळ (हिंजवडी ठाणे ते गुन्हे शाखा), राजेंद्र निकाळजे (एमआयडीसी भोसरी ठाणे ते गुन्हे शाखा), बडेसाब नाईकवडे (पिंपरी ठाणे ते वाहतूक शाखा). ( Internal transfers of 11 Police Inspectors in Pimpri Chinchwad City Police Force )
अधिक वाचा –
– दुःखद! तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गोपाल परदेशी यांचे आकस्मिक निधन, परिसरात शोककळा
– डिजेचा दणदणाट आणि गुलालाची उधळण! मराठा आरक्षण लढ्याला यश मिळताच लोणावळ्यात मराठा बांधवांकडून जल्लोष
– मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाल्यानंतर वडगाव मावळ शहरात सकल मराठा समाजाकडून जल्लोष!