माझी वसुंधरा अभियानांतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत सध्या विविध उपक्रम राबवले जात आहेत. शहरातील नागरिक देखील या अभियानाला चांगला प्रतिसाद देत आहेत. शनिवार (दिनांक 25 मार्च) रोजी माझी वसुंधरा अभियानांतर्गत तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे नगरपरिषद व नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 2 यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी या घटकाच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे शहरात स्टेशन तळे परिसरात पुणे-मुंबई हायवेलगत वृक्ष लागवड उपक्रम राबवण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर उपक्रमाअंतर्गत वड, पिंपळ, ताम्हण, सोनचाफा, बकुळ, स्पॅथोडिया या प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. उन्हाळ्याच्या दिवसात वृक्षांचे जतन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी प्रथम ठिबक सिंचन चे काम या वृक्षलागवड ठिकाणी करण्यात आले आहे. ( Majhi Vasundhara Mission Plantation Of Trees By Students In Talegaon Dabhade City )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहरात वारकरी बंधू भगिनींसाठी मोफत शुगर टेस्टिंग शिबिर, 62 नागरिकांनी घेतला लाभ
– तळेगाव दाभाडे शहरात तब्बल 2 लाख 94 हजारांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त; मुद्देमालासह 2 आरोपी अटक