व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नागरिकांनो काळजी घ्या… बदलत्या हवामानाचा होतोय आरोग्यावर परिणाम

ढगाळ हवामान, मध्येच वाहणारे थंड वारे आणि अधूनमधून पडणारे कडक उन अशा विचित्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 29, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, पुणे
Maval taluka got colder Impact of changing climate on citizens health

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका हा डोंगर दऱ्यांचा तालुका आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात थंडीचा प्रभाव अधिक जाणवतो. त्यातही ग्रामीण भागात थंडीचा कडाका सर्वाधिक असतो. आता मावळात देखील थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे वातावरणात बदल जाणवू लागला असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

ढगाळ हवामान, मध्येच वाहणारे थंड वारे आणि अधूनमधून पडणारे कडक उन अशा विचित्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून लहान मुले व वृद्धांना सर्वाधिक त्रास होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन होत आहे. सरकारी, खासगी दवाखाने या रुग्णांमुळे भरू लागली आहेत.

थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. थंडीचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रात्री तापमान कमी झाल्याने लोकांनी गरम कपडे घालण्यास सुरुवात केलीय, ब्लँकेटचा वापरही सुरू झाला आहे. येत्या 2-3 महिन्यांपर्यंत थंडीपासून बचाव करण्यासाठी या मोसमात आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

काय काळजी घ्याल?
1. हिवाळ्यात आहाराच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक असते. हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी होते, त्यामुळे विशेषतः रात्री भात खाणे टाळावे. ग्रामीण भागात अनेकजण रात्री उशिरा भात खातात, जे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

2. हिवाळ्यात गरम अन्न आणि कोमट पेयांचे सेवन शरीराच्या तापमानाला नियंत्रित ठेवते आणि रोगांपासून संरक्षण करते. गरम अन्न शरीराला गरम ठेवण्यास मदत करते, तसेच पचनाला सहाय्यक ठरते.

3. हिवाळ्यात आहारात शेंगदाणे आणि बदामांचा समावेश करावा. शेंगदाणे प्रोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध असतात, ज्यामुळे शरीर आतून गरम राहते. शेंगदाण्यांतील फायबर पचनास मदत करते, तर व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

4. हिवाळ्यात रोगांपासून बचाव करण्यासाठी कोमट पाणी प्यावे, जे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते व पचनास मदत करते. हळद, आले व काळी मिरी यांसारख्या मसाल्यांचा वापरही फायद्याचा आहे. या मसाल्यांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे संसर्गांपासून संरक्षण देतात.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी द्यावी ; मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादांकडे मागणी
– चार वाहनांमधून तब्‍बल 95 जनावरांची वाहतूक, दहा जणांवर गुन्हा दाखल, उर्से टोलनाक्याजवळील घटना । Maval News
– मावळात सर्वदूर थंडीची लाट… ग्रामीण भागात सर्वाधिक गारठा । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत किल्ले विसापूर ! गडावरील मातीआड गेलेला इतिहास प्रकाशात आणण्याची गरज । Visapur Fort

Next Post

वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Department of Motor Vehicles

वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.