व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील 15 गावांचे कारभारी आज ठरणार! एकूण 21 ग्रामपंचायतींमधील 219 उमेदवारांचा ‘निकाल’ लागणार

रविवारी (दि. 5 नोव्हेंबर) मतदान झालेल्या मावळ तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूका असलेल्या 15 ग्रामपंचायती आणि पोटनिवडणूका असलेल्या 5 ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल आज (दि. 6 नोव्हेंबर) रोजी जाहीर होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 6, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Gram-Panchayat-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


रविवारी (दि. 5 नोव्हेंबर) मतदान झालेल्या मावळ तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूका असलेल्या 15 ग्रामपंचायती आणि पोटनिवडणूका असलेल्या 5 ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल आज (दि. 6 नोव्हेंबर) रोजी जाहीर होणार आहे. वडगाव मावळ इथे ही मतमोजणी होणार आहे. मावळ तालुक्यात सरपंच पदाच्या 15 जागांसाठी 37 उमेदवार, सदस्य पदांच्या 86 जागांसाठी 182 उमेदवार असे एकूण 219 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

मावळ तालुक्यात जाहीर झालेल्या 29 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांपैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित सार्वत्रिक निवडणूका आणि पोटनिवडणूकांसाठी रविवारी, दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. त्यांतर आज प्रत्यक्ष मतमोजणी होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तालुक्यात एकूण सार्वत्रिक निवडणूका असलेल्या 19 गावांपैकी 4 गावे ही सरपंच पदासह पुर्णतः बिनविरोध निवड झाली होती. तर उर्वरित 15 गावांत निवडणूक लागली. या 15 गावांपैकी काही गावांतील सदस्य पदाच्या काही जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे 15 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाच्या 15 जागांसाठी 37 अर्ज आले, ज्यात शिळींब, कोंडिवडे (आं.मा.), उधेवाडी, मळवंडी ढोरे, सांगिसे, मुंढावरे, दिवड या गावांत सरपंच पदासाठी तिरंगी लढत झाली. तर, 15 ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या एकूण 117 जागांपैकी 37 जागा बिनविरोध झाल्या होत्या, त्यामुळे उर्वरित 79 सदस्य पदांच्या जागांसाठी रिंगणात असलेल्या 165 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

दुसरीकडे, तालुक्यात 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या होत्या. यात शिरगाव आणि पुसाणे गावच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक, तर पुसाणेसह कान्हे, खांडशी, कुसगाव, चिखलसे, दारुंब्रे, नवलाख उंब्रे, सावळा, शिवणे गावच्या सदस्य पदाची पोटनिवडणूक होती. पैकी सरपंच पदाच्या दोन्ही आणि सदस्य पदाच्या 11 जागा बिनविरोध निवडूण आल्या. त्यामुळे एकूण 7 सदस्य पदासाठी रिंगणात असलेल्या 17 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

एकंदरीत मावळ तालुक्यातील सरपंच पदाच्या 15 जागांसाठी 37 उमेदवारांचे, सदस्य पदांच्या 86 जागांसाठीचे 182 उमेदवार असे एकूण 219 उमेदवारांचा निकाल आज लागणार आहे. ( Maval Taluka Gram Panchayat Election 2023 Results Updates )

अधिक वाचा –
– सनम शेखने पटकावला मावळ महिला श्री चषकाचा मान; ‘महिला सक्षमीकरण फक्त कागदावरच राहू नये ‘ – संध्या थोरात
– संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन आणि गळीत हंगामाचा शुभारंभ
– तळेगाव स्टेशन सोसायटीच्या चेअरमन पदी दत्तात्रय दाभाडे बिनविरोध, तर व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड


Previous Post

ग्रामपंचायत निवडणूका 2023 : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, छुपा प्रचार जोरात

Next Post

ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत साळुंब्रे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Salumbre-Grampanchayat

ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत साळुंब्रे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.