व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 22, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या लोणावळ्यातील बहुप्रतीक्षित ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. लोणावळ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या कुरवंडे परिसरातील टायगर आणि लायन्स पॉईंट येथे प्रस्तावित सुमारे १२५ मीटर लांबीच्या ग्लास स्कायवॉक प्रकल्पाच्या निविदेचा मसुदा अंतिम करण्यात आला असून, प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मावळ तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना देतानाच लोणावळ्याची पर्यटन ओळख अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने त्यांनी या प्रकल्पासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न केले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप येत असल्याने मावळच्या पर्यटन क्षेत्रासाठी ही अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पुढे नेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि संबंधित यंत्रणांकडून कार्यवाही सुरू आहे. पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयात झालेल्या निविदा छाननी समितीच्या बैठकीत निविदा मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकल्पाला आवश्यक तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून दर विश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून लोणावळ्याच्या निसर्गसौंदर्याचा अधिक आकर्षक पद्धतीने अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ परिसर विकास योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सुमारे २३ मीटर लांबीच्या ‘कॅंटिलीव्हर’ भागासह १२५ मीटर लांबीच्या काचेच्या पुलाचा समावेश आहे. याशिवाय पर्यटकांसाठी आकर्षक प्रवेशद्वार, व्ह्यूइंग गॅलरी, रेस्टॉरंट, पार्किंग व्यवस्था, स्वतंत्र वीज उपकेंद्र, स्वच्छतागृह तसेच परिसराचे व्यापक सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

ग्लास स्कायवॉकमुळे लोणावळा-मावळच्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी एक नवे आकर्षण निर्माण होईल. परिणामी पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ, वाहतूक, पर्यटन सेवा, लघुउद्योजक आणि स्थानिक रोजगाराच्या संधींनाही मोठी चालना मिळणार आहे.

मावळ तालुक्याची निसर्गसंपदा, लोणावळा-खंडाळ्याची पर्यटन ओळख आणि राज्यातील वाढती पर्यटन क्षमता लक्षात घेता ग्लास स्कायवॉक हा केवळ एक पर्यटन प्रकल्प नसून मावळच्या भविष्यातील पर्यटन विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने मावळवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पुढे आलेल्या या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळत असल्याने मावळच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही निश्चितच ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण घडामोड ठरणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच
– मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन
– तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू
– कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

Next Post

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.