व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रेयस दर्डे, आदेश फलके, रुशील पटाडिया यांंच्या प्रकल्पांची राजस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड । Kamshet News

51 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कामशेत येथील सुमन रमेश तुलसानी टेक्निकल कॅम्पसमध्ये तीन दिवस घेण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 26, 2024
in लोकल, ग्रामीण
Science-Exhibition-kamshet-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्हा परिषद,पंचायत समिती मावळ, तालुका मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले 51 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कामशेत येथील सुमन रमेश तुलसानी टेक्निकल कॅम्पसमध्ये तीन दिवस घेण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील शाळांमधील 140 प्रकल्पांची मांडणी यावेळी करण्यात आली होती. यामध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी प्राथमिक आणि माध्यमिक प्रत्येकी तीन, अदिवासी गट, दिव्यांग गट, शिक्षक व परिचारक गटातील एक-एक प्रकल्पांची निवड करण्यात आली. त्या विद्यार्थांचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.

माध्यमिक व उच्च प्राथमिक गटातील विद्यार्थांंना पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, वैज्ञानिक अंकिता नगरकर, मुख्याध्यापक संघ जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड, जिल्हा सचिव प्रसाद गायकवाड, मावळ तालुका मुख्यध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, उपशिक्षणाअधिकारी निलेश धानापुणे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अस्मा मोमिन, डायट अधिव्याख्याता श्रीमती नलावडे शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर चटणे, मावळ शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, तुलसानी कॉलेजच्या प्राचार्या श्रध्दा चव्हाण, विज्ञान संघाचे अध्यक्ष सुरेश सुतार यांंच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. ( Pune District Level Science Exhibition at Kamshet Maval Read Final Result )

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन मुकुंद तनपुरे,ज्योती लावरे यांनी बक्षीस वाचन विकास गायकवाड, संतोष भोसले, मनोज पवार यांनी तर आभार शोभा वाहिले यांनी मानले. विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी जिल्हा व मावळ मुख्याध्यापक संघ, विज्ञान अध्यापक संघ, मावळ सर्व केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती पंंचायत समिती सर्व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : राज्य स्तर निवड
गट 9वी ते 12वी :
प्रथम – श्रेयस दर्डे, द्वितीय – अमिशा कुलकर्णी, तृतीय – ज्ञानेश्वरी हरगुडे
आदिवासी विभाग : प्रथम – आदेश गणेश फलके, द्वितीय – राजवीनी हांडे
दिव्यांग गट : प्रथम – रुशील मिलिंद पटाडीया, द्वितीय – राधिका दत्तात्रय कलाल
गट 6वी ते 8वी : प्रथम – धनश्री सुर्यकांत मुंढे, द्वितीय – मयुरी सुभाष काकडे, तृतीय – प्रीती उमेश लांडगे
आदिवासी गट : प्रथम – सिद्धार्थ राजेंद्र राउत, द्वितीय – ईश्वरी कोकणे
दिव्यांग गट : प्रथम – ओम बाजारे, द्वितीय – प्रणव सतीश हरपळे
प्राथमिक शिक्षक गट : प्रथम – एस.पी. खैरमोडे, द्वितीय – नदाब हुसेन मेहबुब
माध्यमिक शिक्षक गट : प्रथम – अरुंधती सुहास अंबिके, द्वितीय – अनिल मारवीन
स्कॉट परिचर गट : प्रथम – सचिन रामदास सोंडकर, द्वितीय दादासाहेब दिनकर पिंगळे

अधिक वाचा –
– प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 6 जणांना पद्मभूषण आणि 6 जणांना पद्मश्री जाहीर, पाहा यादी । Padma Awards 2024
– खुशखबर! मावळच्या इंद्रायणी भाताला जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, कृषी आयुक्तांचे आमदार सुनिल शेळकेंना आश्वासन
– मावळ तालुक्यातील सावळा गावात 10 दिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; महिलांना कृषी साहित्यांचे वाटप


dainik maval jahirat

Previous Post

जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्यांना अटक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई, मंगरूळ गावच्या हद्दीतील घटना । Maval Crime

Next Post

मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा! ‘सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीपर्यंत द्या, उद्या दुपारपर्यंत वाशीत थांबणार अन्यथा पुन्हा मुंबईकडे निघणार…आझाद मैदानावर गुलाल उधळणार’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
manoj-jarange-patil

मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा! 'सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीपर्यंत द्या, उद्या दुपारपर्यंत वाशीत थांबणार अन्यथा पुन्हा मुंबईकडे निघणार...आझाद मैदानावर गुलाल उधळणार'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.