व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Pune : अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त ; पाच आरोपींना अटक

परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्याच्या तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाने सापळा रचून दोन स्वतंत्र कारवाया केल्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 19, 2025
in पुणे, ग्रामीण, शहर
Pune State Excise Department seizes goods worth Rs 48 lakh against illegal liquor smuggling

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्याच्या तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाने सापळा रचून दोन स्वतंत्र कारवाया केल्या असून एकूण पाच आरोपींना अटक करून वाहनांसह सुमारे ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

उरुळी कांचन गावाच्या हद्दीत पुणे–सोलापूर रोडवर गोपनीय माहितीच्या आधारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, के विभाग, पुणे पथकाने चारचाकी वाहन (MH12-MR-1904) तपासले. वाहनातून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या मोठ्या प्रमाणात बाटल्या आढळून आल्या. वाहनचालकास अटक करण्यात आली. पुढील तपासात मुख्य सूत्रधारास करमाळा (जि. सोलापूर) येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण तीन आरोपींना अटक करून वाहनासह सुमारे ४ लाख ७१ हजार ७८० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सासवड विभागाच्या पथकाने सातारा–पुणे राष्ट्रीय महामार्गावर सारोळा गावाच्या हद्दीत सापळा रचून सहाचाकी ट्रक (MH12-SF-5918) तपासला. औषधांच्या आडून गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्य वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले. पुढील तपासात एक ट्रक चारचाकी वाहनासह मोठ्या प्रमाणात मद्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करून वाहनांसह एकूण ४३ लाख ५७ हजार ४०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई राजेश देशमुख, सह-आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे तसेच विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे सागर धोमकर यांच्या आदेशानुसार आणि अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील दोन महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी परराज्यातील स्वस्त दारू येण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २१ पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. सराईत गुन्हेगारांवर विशेष पाळत, रात्रगस्त व वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अतुल कानडे यांनी दिले आहेत.

अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. अवैध मद्याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००-२३३-९९९९ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२७३२१ वर संपर्क साधावा, असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

धक्कादायक ! ‘फास्टटॅग’मध्ये पैसे नसल्याने तळेगाव टोलनाक्यावर शिवनेरी बस अडवून ठेवली ; प्रवाशांनी वर्गणी करून भरला टोल

Next Post

मोठी बातमी ! महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चेनंतर संघटनांचा निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी ! महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चेनंतर संघटनांचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.