व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पेपर सोडवून शाळेच्या गेटबाहेर येताच विद्यार्थी आणि त्याच्या मित्रांना टोळक्याकडून मारहाण, तळेगावातील धक्कादायक घटना

तळेगाव दाभाडे शहरातील आदर्श शाळेच्या गेटबाहेर शाळेतील विद्यार्थी आणि त्याच्या दोन मित्रांना टोळक्याकडून बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 20, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Talegaon-Dabhade-Police-Station

File Photo


तळेगाव दाभाडे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील आदर्श शाळेच्या गेटबाहेर शाळेतील विद्यार्थी आणि त्याच्या दोन मित्रांना टोळक्याकडून बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Student And His Friends Were Beaten Up By Gangs Outside Gate Of Adarsh ​​School Shocking Incident In Talegaon Dabhade City )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिनांक 15 मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आदर्श शाळेच्या गेट समोर तळेगाव दाभाडे (ता. मावळ जि. पुणे) इथे हा संपूर्ण प्रकार घडला. एका 17 वर्षीय मुलाने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुख्य तिघे आणि आणखीन चार ते पाच जणांवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 143, 147, 148, 326 आर्म अॅक्ट 4, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 15 मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी तरुण हा आणखी एका मित्राला मोटारसायकलवर सोबत घेऊन पेपरला बसलेल्या विद्यार्थी मित्राला आणण्यासाठी गेला होता. तेव्हा संबंधित मुलगा पेपर देऊन शाळेबाहेर आल्यानंतर त्याच्यासोबतचा जुणा राग मनात धरुन फिर्यादीत नमुद आरोपींनी फिर्यादी, त्याचा मोटारसायकलवरील मित्र आणि पेपर सोडवून आलेल्या विद्यार्थी तरुणाला हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

हेही वाचा – देशी बनावटीचे पिस्तूल आणि किलोभर गांजा सह दोन तरूणांना मावळ तालुक्यातील पुसाणे येथून अटक

तसेच एका मुख्य आरोपीने हातात लोखंडी रॉड घेवून फिर्यादीच्या डोक्यात आणि त्याच्यासोबत मोटारसायकलवर आलेल्या मित्राच्या हातावर मारून त्यांना जखमी केले. तसेच आणखी एका मुख्य आरोपीने पेपर देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थी तरुणाच्या उजव्या कानावर दगड मारून त्याला जखमी केले. तसेच इतर आरोपींनी तिघांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले असे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. सदर प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि इंगळे हे करत आहेत.

अधिक वाचा –

– मावळ तालुक्यात हे काय सुरु आहे? प्रेम प्रकरणावरून एकाला घरात घुसून मारहाण आणि…
– तळेगाव दाभाडे शहरात राहत्या घरासमोरून दुचाकी लंपास, अज्ञात चोरट्यावर गुन्हा


dainik maval jahirat

Previous Post

सावधान, तो परत येतोय! महाराष्ट्रात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय, मुंबई-पुणे भागात परिस्थिती चिंताजनक

Next Post

वडगाव शहरात गुढीपाडवा उत्सवानिमित्त भव्यदिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन; 350 कलाकार आणि बरंच काही, वाचा अधिक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-Gudhipadawa-Shobha-Yatra

वडगाव शहरात गुढीपाडवा उत्सवानिमित्त भव्यदिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन; 350 कलाकार आणि बरंच काही, वाचा अधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.