मुलाच्या लग्न सोहळ्यातील कार्यक्रमादरम्यान आईची सोने आणि पैशाने भरलेली बॅग लंपास केली गेल्याची घटना सोमाटणे (ता. मावळ) येथे घडली. याप्रकरणी संबधित महिलेने तळेगाव दाभाडे पोलिसांत 26 तारखेला फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध भादवी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 20 जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास इमरॉल्ड हॉटेल सोमाटणे इथे ही घटना घडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत संबंधित महिलेच्या मुलाचे सोमाटणे येथील हॉटेलमध्ये विवाहसोहळा होता. तेव्हा संगीताचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी महिलेजवळ एक पिशवी होती, त्यातील पर्समध्ये 4 लाख 83 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने, काही रोख रक्कम, काही कागदपत्रे आणि मोबाईल होता. ती बॅग कुणीतरी अज्ञात महिलेने शिताफीने चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोउपनि शिंपणे हे याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ( theft of mother gold and money during son wedding at somatne talegaon dabhade police )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील 11 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, पाहा संपूर्ण यादी । Pimpri Chinchwad Police
– पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा ब्लॉक! ‘या’ 12 लोकल गाड्या रद्द, पाहा यादी । Block on Pune Lonavala Railway Route
– श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सांबर हरणाचा जीव वाचवण्यात प्राणीमित्रांना यश, मावळमधील नेसावे येथील घटना । Maval News