Dainik Maval News : मावळ तालुक्यात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या ऐतिहासिक यशाचा आणि भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी देशभक्त मावळकरांनी तिरंगा यात्रेत सहभाग घेतला. श्री क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन तिरंगा यात्रेला सुरवात करुन मावळ पंचायत समिती चौकापर्यंत झालेल्या या यात्रेत देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
भारतीय सैन्याने दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देत देशाचा गौरव वाढविला आहे. ही यात्रा आपल्या वीर सैनिकांप्रती आदर व्यक्त करणारी आणि शहीदांना श्रद्धांजलीचं प्रतीक होती. या यात्रेत प्रचंड पावसातही नागरिकांनी व विशेष करून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर सह सहभाग घेतला.
- ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर सशस्त्र दलातील जवानांचे आभार व्यक्त करण्यासाठी मंगळवारी (दि. 20) मावळ तालुक्यात ही भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. श्री क्षेत्र देहूगाव ते वडगाव मावळ अशी तिरंगा यात्रा सर्व पक्षांच्या वतीने काढण्यात आली. देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यापासून मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास भर पावसात तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सर्वच पक्षातील पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देहूगाव,देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द, देहूरोड बाजारपेठ,तळेगाव दाभाडे,वडगाव मावळ असा या यात्रेचा मार्ग होता. सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात नागरिक तिरंगा यात्रेत सहभागी झाले. ध्वनीक्षेपकावर देशभक्तीपर गीते गाणी भारत माता की जय च्या घोषणा देण्यात येत होत्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News