व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमधील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा गुन्हा उलगडला, पोलिसांकडून दोन तासात आरोपी गजाआड । Vadgaon Maval

मंगळवारी (दि.12 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वडगावातील दत्त मंदिराच्या पाठीमागील बाफना यांच्या नर्सरीमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 14, 2024
in लोकल, शहर
Vadgaon-Maval-Police-Station

File Photo


Dainik Maval News : मंगळवारी (दि.12 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वडगावातील दत्त मंदिराच्या पाठीमागील बाफना यांच्या नर्सरीमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. वडगाव मावळ पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. अवघ्या दोन तासात मृत महिलेचे ओळख पटविण्यात आली आणि मयताचे नातेवाईक निष्पन्न करुन अधिकचा तपास करीत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी फिर्यादी राजकरण महोदव कुशवाह (वय 45 वर्षे, रा. वडगांव मावळ, मुळ रा. जिल्हा रिवा, मध्यप्रदेश) यांनी वडगाव मावळ पोलिसांत याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मृत महिला ही फिर्यादीची पत्नी असून राजकरण कुशवाह याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृत महिलेचा खून केल्याप्रकरणी आरोपी सलीमखान उर्फ साईबाबा नासिर खान (वय 35 वर्षे, रा. वडगांव मावळ) याला अटक केली आहे. मंगळवारी (दि.१२) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी सव्वाचारच्या दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपीवर यापूर्वी नागपाडा पोलीस स्टेशन, मुंबई येथे 2007 साली खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात आरोपीला शिक्षा झाली होती. सदर आरोपी मार्च 2022 मध्ये बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून आरोपीची 18 नोव्हेंबर पर्यंत पोलीस रिमांड मंजूर करण्यात आली आहे. तसेच एपीआय डोईजड हे प्रकरणाचा अधिकचा तपास करीत आहेत.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक राजेंद्र मायने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम, एपीआय शितलकुमार डोईजड, पीएसआय सांगळे, पीएसआय ऋतुजा मोहिते, पीएसआय सुनील जावळे, हेडकॉन्स्टेबल सचिन देशमुख, सचिन गायकवाड, संजय सुपे, आशिष काळे, गणपत होले सचिन काळे, विशाल जांबळे, पोलीस शिपाई संपत वायाळ, विठ्ठल पतुरे, चेतन कुंभार, गणेश होळकर, संजय बगाड, प्रतीक राक्षे, प्रफुल गोरे, देविदास भांगे, किरण ढोले तसेच पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफ अतिशय शिताफीने तपास करुन कमी वेळेत गुन्हा उघड करून आरोपीला अटक केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात ; चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway
– ‘मी कधीही श्रेय घेतलं नाही, विकासकामांचे भूमिपूजन – उद्घाटन देखील ज्येष्ठांच्या महिलांच्या हस्तेच केलंय’ – आ. शेळके
– विकास केलाय मग जनतेला विमान प्रवासाचे प्रलोभन का दाखवताय? बापूसाहेब भेगडेंची आमदार शेळकेंवर टीका


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे शहरात पोलिसांचा रूट मार्च ; मावळ विधानसभेचे प्रमुख उमेदवार तळेगाव शहरात असल्याने विशेष दक्षता

Next Post

मावळची संस्कृती बिघडवून टाकली ; बापूसाहेब भेगडे यांची आमदार सुनिल शेळकेंवर तीव्र शब्दात टीका । Bapu Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
maval mla Sunil Shelke spoiled the culture of Maval Criticism of Bapu Bhegde

मावळची संस्कृती बिघडवून टाकली ; बापूसाहेब भेगडे यांची आमदार सुनिल शेळकेंवर तीव्र शब्दात टीका । Bapu Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.