व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मदतीचा हात; मालेवाडी, महागाव येथे महिलांना पिठाची गिरण आणि मसाला बनवण्याच्या यंत्राचे वाटप

महागाव, मालेवाडी (ता. मावळ जि. पुणे) या ठिकाणी दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी मशीनचे उद्घाटन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 23, 2024
in लोकल, ग्रामीण
Women-Economic-Empowerment

Photo Courtesy : Team Dainik Maval


हॅन्ड इन हॅन्ड इंडिया सामाजिक संस्था तळेगाव दाभाडे आणि फिन्चम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि उन्नतीसाठी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करणे, त्यांना सरकारी योजनांची माहिती देणे, सोबतच व्यवसायासाठी प्रशिक्षण आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे, हे कार्यक्रम राबवले जात आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ह्या अंतर्गत मालेवाडी महागाव इथे महिला बचत गटातील महिलांना पीठ गिरण आणि मसाला बनवण्याच्या यंत्रांचे वाटप करण्यात आले. मदतीचा मुख्य उद्देश हा महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण असून विविध प्रकारच्या महिला बचत गटांना कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच त्यांना उद्योग निर्मितीसाठी सहाय्य करणे हा आहे. ( Women Economic Empowerment Distribution of flour mill and spice making machine at Malewadi Mahagaon )

महागाव, मालेवाडी (ता. मावळ जि. पुणे) या ठिकाणी दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी मशीनचे उद्घाटन करण्यात आले. मालेवाडीत आणि इतर वाडीतील ग्रामस्थांना दळण दळण्यासाठी पवनानगर इथे जावे लागते. पण ह्या मशीनने त्यांचा वेळ आणि पैसा याची बचत होण्यास आणि उत्पन्नात वाढ होण्यात मदत होणार आहे.

मशीनचे उद्घाटन सरपंच गोरख डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हॅन्ड इन हॅन्ड कडून ओंकार कुलकर्णी, कविता ढोकरे, अश्विनी खराडे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी ओंकार कुलकर्णी यांनी ग्रामपंचायत महागाव सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचे आभार मानले.

अधिक वाचा –
– ‘मावळ तालुक्यात ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्यात त्यांची यादी ग्रामपंचायतीबाहेर लावावी’; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन
– मदतीचा हात! विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेतील 70 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप । Dehu News
– शेकडो वर्षांची प्रतिक्षा संपली… प्रभू श्रीराम राममंदिरात विराजमान! पाहा रामलल्लाचं तेजस्वी रुप । Ram Lalla Idol Unveiled ShriRam Temple Ayodhya


dainik maval jahirat

Previous Post

मुंबईच्या दिशेने निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ 24 तारखेला मावळ तालुक्यात येणार; वाकसई इथे 100 एकरात जंगी सभेची तयारी । Maratha Reservation

Next Post

कार्ला जवळील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहुब पुतळा, जरांगे स्वतः पुतळा पाहायला येणार? । wax statue of manoj jarange patil

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
wax-statue-manoj-jarange

कार्ला जवळील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहुब पुतळा, जरांगे स्वतः पुतळा पाहायला येणार? । wax statue of manoj jarange patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.