व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील नारायणी धाम इथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपाल रमेश बैस यांची भेट

तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त - राज्यपाल रमेश बैस

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 1, 2023
in महाराष्ट्र, लोकल, शहर
Governor-Ramesh-Bais

Photo Courtesy : Twitter / maha_governor


पुरुषोत्तम मासानिमित्त लोणावळा ( Lonavala ) येथील नारायणी धाम येथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपाल रमेश बैस ( Governor Ramesh Bais ) यांनी भेट दिली व श्रोत्यांशी संवाद साधला. तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त असून तरुणांनी भागवत कथा कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

लोणावळा येथील नारायणी धाम येथे आयोजित श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस सहभागी (सोमवार, दिनांक 31 जुलै) झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. प.पू. स्वामी गिरीशानंद सरस्वती महाराज यावेळी उपस्थित होते. ( Governor Ramesh Bais visits Shrimad Bhagwat Katha Week ongoing at Narayani Dham in Lonavla )

‘मानव जीवन अनमोल आहे. भागवत कथेमुळे मानवी मनाचे शुद्धीकरण होऊन शांती आणि मुक्ती मिळते. सत्संगामुळे विवेक मिळतो आणि प्राणीमात्रांचा लौकिक व आध्यात्मिक विकास होतो. श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन केल्यास आणि उद्देशपूर्ण जीवनपद्धतीचा अंगिकार केल्यास युवकांना संयमी आणि सक्षम व्यक्तिमत्व घडविता येईल. श्री गिरीशानंद सरस्वती महाराजांनी नर्मदा शुद्धीकरणासाठी मोठे कार्य केले आहे,’ असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

पुरुषोत्तम मासानिमित्त लोणावळा येथील नारायणी धाम येथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपाल रमेश बैस यांनी भेट दिली व  श्रोत्यांशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांनी कथाकार स्वामी श्री गिरीशानंद महाराज यांना वंदन केले. pic.twitter.com/7Mt0I6feNg

— Governor of Maharashtra (@maha_governor) July 31, 2023

राज्यपाल महोदयांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात समर्पण भावनेने कार्य केले असल्याचे गिरीशानंद सरस्वती महाराज म्हणाले. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची त्यांनी प्रशंसा केली आणि नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या ‘या’ योजना तुम्हाला माहितीयेत का? नक्की जाणून घ्या…
– शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण – कृषिमंत्री धनंजय मुंडे
– आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता 5 लाखांचे आरोग्य संरक्षण कवच, जाणून घ्या सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोक्का पॅटर्न! डोंगरे, परदेशी, मोतीरावे टोळ्यांवर मोक्का, एकूण 24 टोळ्यातील 226 गुन्हेगारांवर कारवाई

Next Post

महत्वाची बातमी! पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार पीक विमा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
crop-insurance

महत्वाची बातमी! पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत भरता येणार पीक विमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.