व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाकडून पवना धरणाचे जलपुजन; पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त पवनानगर इथे वृक्षारोपण

पवन मावळ भागातील हजारो शेतकरी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो नागरिकांची तहान भागवणारे पवना धरण आजमितीला 94 टक्के इतके भरले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 7, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
shivsena-maval-taluka

Photo Courtesy : Machindra Kharade


पवन मावळ भागातील हजारो शेतकरी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो नागरिकांची तहान भागवणारे पवना धरण आजमितीला 94 टक्के इतके भरले आहे. पवना धरण परिसरात मागील दोन आठवड्यापासून वरुणराजा नित्यनेमाने बरसत आहे. त्यामुळेच धरणात पाण्याची सातत्याने आवक होऊन धरणातील पाणीसाठा शंभरीच्या जवळ पोहोचला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरवासीय आणि मावळ तालुक्यातील सामान्य नागरिक, शेतकरी ह्यांच्या वर्षभराची चिंता आता मिटली आहे. त्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पवना धरणातील पाण्याचे जलपुजन केले आणि आनंद साजरा केला. ह्यासह पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त (27 जुलै) सुरु असलेल्या वृक्षलागवड पंधरवडा अनुषंगाने वृक्षारोपण देखील करण्यात आले. ( shiv sena uddhav balasaheb thackeray party workers offer jal pujan at pavana dam )

मावळ तालुक्याचे वैभव, शेतकरी कुटुंबाची आई, मावळ तालुका आणि पिंपरी चिंचवड महानगराची तहान भागवण्यासाठी सदैव तयार असणारी पवनामाई ह्या नदीचे उगमस्थान म्हणजेच पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यानिमत्त रविवारी (दिनांक 6 ऑगस्ट) मावळ तालुका शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने जल पूजन संपन्न झाले. तसेच पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या वृक्ष पंधरवडा कार्यक्रमाचे औचित्य साधत पवनानगर इथे वृक्षरोपण देखील करण्यात आले.

ह्याप्रसंगी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी उप जिल्हाप्रमुख भारत ठाकूर, मावळ तालुका संघटक शांताराम भोते, पवनानगर शहर प्रमुख सुरेश गुप्ता, माजी सरपंच अनिल भालेराव, शाखा प्रमुख उमेश ठाकर, प्रिया उमेश ठाकर, उपसरपंच शामबाबू वाल्मिकी, इंद्रजीत तिवारी, अविनाश शिंदे, सुनिल इंगुळकर, तुषार घाग, राहुल जव्हेरी, संतोष कालेकर, प्रवीण कालेकर, नरेश घोलप, सोमनाथ कचरे, अक्षय कालेकर, दत्ता दाभाडे, पवन मावळ प्रसिध्दी प्रमुख किशोर शिर्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळात तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीजेची लाईन पडून मृत्यू; महावितरणच्या गलथान कारभाराचा आणखीन एक बळी
– राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल! सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना
– काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्यावर मावळ लोकसभेची जबाबदारी; महाविकासआघाडीत नेमकं चाललंय काय?


dainik maval jahirat

Previous Post

केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

‘अजितदादा पहिल्यांदाच माझ्यासोबत बसलेत…दादा…आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात’, वाचा काय म्हटले अमित शाह?

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
amit-shah-ajit-pawar

'अजितदादा पहिल्यांदाच माझ्यासोबत बसलेत...दादा...आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात', वाचा काय म्हटले अमित शाह?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.