व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पाणी योजनांसाठी जागा उपलब्ध होत नसलेल्या 13 गावांतील गावकऱ्यांना आमदार सुनिल शेळकेंचे जाहीर आवाहन, वाचा

मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या टाकींसाठी तेरा गावांमध्ये जागा उपलब्ध होत नसल्यामुळे आमदार सुनिल शेळके यांनी त्या गावांमध्ये बॅनर लावून स्थानिक नेतेमंडळींसह ग्रामस्थांना जाहीर आवाहन केले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 8, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Sunil-Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या टाकींसाठी तेरा गावांमध्ये जागा उपलब्ध होत नसल्यामुळे आमदार सुनिल शेळके यांनी त्या गावांमध्ये बॅनर लावून स्थानिक नेतेमंडळींसह ग्रामस्थांना जाहीर आवाहन केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

जाहीर आवाहनात आमदार शेळके यांनी म्हटले आहे की, “गावातील पुढारी मंडळी व ग्रामस्थांना जाहीर आवाहन, आपल्या गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत निधी उपलब्ध झाला असुन सदर पाणी योजनेचा विकास आराखडा बनविताना भविष्याचा विचार करुन लोकसंख्येनुसार पाण्याची टाकी बांधणेसाठी ग्रामपंचायतीकडून हमीपत्र प्राप्त झाले होते. परंतु सदर टाकीसाठी अद्यापही जागा उपलब्ध करुन दिलेली नसल्याने योजनेचे काम रखडले आहे. तरी कृपया, गावाच्या हितासाठी सर्वांनी एकमताने विचार करुन टाकीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि आपल्या गावातील पाणी योजनेचे प्रलंबित असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, ही नम्र विनंती.”

  • मावळात नऊ धरणे असुन देखील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. विशेषतः महिलांना पाणी आणण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो. आमदार सुनिल शेळके यांनी निवडणुकीआधी दिलेला शब्द पाळून प्रत्येक घरापर्यंत पाणी आणण्याचे स्वप्न सत्यात साकारले. यासाठी प्रत्येक स्तरावर पाठपुरावा, वेळोवेळी संयुक्त बैठका घेऊन ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे 112 पाणी योजनांचे काम सुरु आहे. अनेक योजनांचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु काही गावातील तांत्रिक अडचणीमुळे कामांना विलंब होत आहे. वारंवार पाठपुरावा करुन देखील स्थानिक लोकप्रतिनिधी, पुढारी मंडळी, ग्रामस्थ गांभीर्याने घेत नसल्यामुळे अखेर आमदार शेळके यांनी गावात बॅनर लावून जाहीर आवाहन केले आहे.

तालुक्यात अनेक दानशूर व्यक्तींनी पाण्याच्या टाकीसाठी जागेसाठी जागा देऊन गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी योगदान दिले आहे. अनेक कुटुंबांनी दातृत्वाचा आदर्श यामाध्यमातून समाजासमोर ठेवला आहे. तालुक्यातील गावांच्या विकासासाठी मूलभूत आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर असतो. त्यासाठी पुरेसा निधी विविध माध्यमांतून उपलब्ध करण्यात येतो. परंतु संबंधित विकास कामांच्या उभारणीसाठी ग्रामपंचायतीकडे जागाच उपलब्ध नसते. केवळ जागेअभावी गावाच्या विकासाला खीळ बसू नये, ही यामागची भावना असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

टाकीसाठी जागा उपलब्ध नसलेली गावे –
गावाचे नाव – टाकी क्षमता
आंबळे – 10 हजार लिटर
भाजगाव – 17 हजार लिटर
गोवित्री – 58 हजार लिटर
नागाथली – 8 हजार लिटर
सांगिसे – 10 हजार लिटर
थोरण – 20 हजार लिटर
शिरदे – 17 हजार लिटर
शिवली – 61हजार लिटर
भडवली – 42 हजार लिटर
गेव्हंडे खडक – 20हजार लिटर
पांगळोली – 85 हजार लिटर
वारु – 28 हजार लिटर
कादव – वाघेश्वर – 26 हजार लिटर

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटपास सुरु, मावळ तालुक्यात 37 हजार शिधा संचाचे होणार वाटप
– काँग्रेस (आय) पक्षाच्या मावळ तालुका ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्षपदी बंडोबा मालपोटे यांची नियुक्ती
– मावळात 21 पैकी 13 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे सरपंच! भाजप-राष्ट्रवादी दोघांचाही दावा असलेले 2 सरपंच कोणते? वाचा


dainik maval jahirat

Previous Post

‘पवना नदी प्रदूषणला महापालिका अधिकारी जबाबदार; कारवाई करा, अन्यथा जनहित याचिका’ – खासदार श्रीरंग बारणे

Next Post

वडगाव शहरात भाजपातर्फे मतदार नोंदणी अभियान; पाहा शहरात कधी आणि कुठे होणार शिबिर?

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
New-Voter-Registration

वडगाव शहरात भाजपातर्फे मतदार नोंदणी अभियान; पाहा शहरात कधी आणि कुठे होणार शिबिर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.