व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मळवंडी ठुले ग्रामस्थांची 40 वर्षांपासूनची मागणी आमदार शेळकेंकडून पूर्ण! 60 लाख निधीतून बांधणार नवा साकव पूल । Maval News

दुर्गम व डोंगर पठारावरील असणाऱ्या कोणजाई वस्तीकडे जाण्यासाठी मोठा ओढा ओलांडून नागरिकांना जावे लागत होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 12, 2024
in लोकल, ग्रामीण
malwandi-thule-village-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळ : आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या 60 लाख निधीतून मळवंडे ठुले येथील कोणजाई वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव पूल बांधणे कामाचा भूमिपूजन समारंभ (दि. 12 जानेवारी) संपन्न झाला. या निधीतून खोल असणाऱ्या ओढ्यावर सुमारे पंचवीस मीटर लांब आणि साडेपाच मीटर रुंद साकव पूल बांधण्यात येणार असून यामुळे या वस्तीवरील नागरिकांचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दुर्गम व डोंगर पठारावरील असणाऱ्या कोणजाई वस्तीकडे जाण्यासाठी मोठा ओढा ओलांडून नागरिकांना जावे लागत होते. मात्र पावसाळ्यात पाणी वाढल्यावर या वस्तीवरील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटत होता. सुमारे दोन ते तीन किलोमीटर वळसा घालून शेतांच्या बांधावरुन शाळेतील मुले व ग्रामस्थांना जावे लागत होते. ओढ्याची खोली जास्त असल्याने ग्रामस्थांना अत्यंत धोकादायक पद्धतीने येथून प्रवास करावा लागत असे. ( 60 lakh fund for new Bridge at malwandi thule village maval through mla sunil shelke )

कोणजाई वस्तीकडे जाण्यासाठी पुल बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून चाळीस वर्षांपासुन होत होती. अखेर ग्रामस्थांची गैरसोय ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी या पुलासाठी निधी उपलब्ध करुन दिला. त्याबद्दल ग्रामस्थांकडून आमदार शेळके यांचे आभार व्यक्त करण्यात आले. भूमिपूजन प्रसंगी माजी चेअरमन नामदेव ठुले, सरपंच जयश्री राक्षे, उपसरपंच ज्ञानेश्वर ठुले, शाम वर्वे, शिवाजी वर्वे,सुशीला शिंदे, नामदेव राक्षे, ज्ञानेश्वर बेंगुडे, नारायण मालपोटे, अजिंक्य टिळे, योगेश तुपे, योगेश राक्षे, वसंत पवार आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा –
– PM Kisan योजनेचे पैसे मिळाले नाहीत? योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आजच पूर्ण करा ‘ई-केवायसी’, जाणून घ्या प्रक्रिया
– युवा दिन विशेष : ‘गरजू लेकरांना तिनं दिलाय मदतीचा खंबीर हात’ । Help Welfare Trust Deepali Warule
– मावळ तालुक्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना, 5 नव्या मंडळांची निर्मिती; तुमचे गाव कोणत्या मंडळात? पाहा संपूर्ण यादी । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीची कार्यकारिणी जाहीर; 1 मे रोजी होणार विवाह सोहळा । Vadgaon Maval

Next Post

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भाजपाकडून रक्तदान शिबिर; रविंद्र भेगडेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही केले रक्तदान । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BJP-Maval

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भाजपाकडून रक्तदान शिबिर; रविंद्र भेगडेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही केले रक्तदान । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.