व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात मनोज जरांगे पाटलांचा खास मावळा पगडी देऊन सन्मान; पगडी डोक्यावर चढवताच पाटील भावूक । Manoj Jarange Patil In Lonavala

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघालेले लाखो मराठा आंदोलक आणि त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज, गुरुवारी (दि. 25) लोणावळ्याहून पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 25, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
manoj-jarange-Mavala-Pagadi

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघालेले लाखो मराठा आंदोलक आणि त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज, गुरुवारी (दि. 25) लोणावळ्याहून पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज मराठ्यांच्या भगव्या वादळाचा वाशी येथे मुक्काम असणार आहे. तत्पुर्वी गुरुवारी दुपारी पाऊणेबाराच्या सुमारास जरांगे पाटील यांची लोणावळ्यात जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितली. दरम्यान भाषणात त्यांनी मावळ तालुक्यातील मराठा बांधवांचे कौतूक केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मनोज जरांगे पाटील हे आज सकाळी काही काळ विश्रांतीसाठी वाकसई येथे थांबले होते. जाहीर सभेपूर्वी त्यांनी काहीवेळ आराम केला आणि नंतर ते सभास्थळी दाखल झाले. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा खास मावळा पगडी देऊन सन्मान करण्यात आला. मावळ तालुक्यातील मराठा बांधवांचे प्रेम पाहून, आणि मावळ तालुक्यात मानाच्या मावळा पगडीने झालेला सन्मान पाहून जरांगे पाटील भावूक झाले. ( Manoj Jarange Patil was honored with Mavala Pagadi in Maval taluka )

महाराष्ट्र शासन मराठी चित्रपट अनुदान समितीचे सदस्य भुषण जगताप यांच्या वतीने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने जरांगे पाटील यांना मावळा पगडी देऊन सन्मान करण्यात आला. मराठा समाजाचे खरेखुरे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे या मावळी पगडी चे खरे मानकरी असल्याने त्यांना ही पगडी दिल्याचे भुषण जगताप यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– मनोज जरांगे पाटील मावळ भूमीत दाखल, पहाटे उशीरा वाकसई मुक्कामस्थळी जरांगेंचे आगमन, 9 वाजता होणार जाहीर सभा । Maratha Reservation Manoj Jarange Patil
– व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खोटी माहिती पसरवणे ते चौकात बॅनर लावणे, कलम 144 मुळे लोहगड भागात कशावर प्रतिबंध? जाणून घ्या । Lohgad Fort News
– लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूसाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी । Lohgad Fort News


Previous Post

किवळे, देहू बाजारपेठ भागात एफडीएचे छापे, तब्बल 35 लाखांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन, वाचा… । Crime News

Next Post

पाटील एक फोटो प्लीज..! लोणावळ्यात प्रति मनोज जरांगे पाटलांची हवा, फोटो-सेल्फीसाठी नागरिकांची झुंबड – पाहा Photo । Manoj Jarange Patil

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Duplicate-Manoj-Jarange-Patil

पाटील एक फोटो प्लीज..! लोणावळ्यात प्रति मनोज जरांगे पाटलांची हवा, फोटो-सेल्फीसाठी नागरिकांची झुंबड - पाहा Photo । Manoj Jarange Patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Raigad News Lost mobile phone recovered Khopoli police efforts successful joy on faces of 40 citizens

Khopoli News : हरवलेले मोबाईल पुन्हा हातात ; खोपोली पोलिसांच्या प्रयत्नांना यश, ४० नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद

May 25, 2026
Fort conservation campaign completed at Tikona Fort in Pawan Maval area

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे, सह्याद्री आणि मी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मावळातील तिकोणा गडावर दुर्गसंवर्धन मोहीम

May 25, 2026
Pavana-Dam

Pawana Dam Update । पवना धरणात २७ टक्के पाणीसाठा ; ‘या’ तारखेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

May 25, 2026
Maval Taluka Congress party demands strict action against culprits in NEET paper leak case

नीट (NEET) पेपर लीक प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाची मागणी

May 25, 2026
Forced sale of non-subsidized fertilizers along with subsidized fertilizers stopped Agriculture Minister Dattatreya Bharane

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीने होणारी विक्री बंद

May 25, 2026
Concrete decisions to accelerate Lonavala Sky Walk project joint meeting of MLA Sunil Shelke District Collector PMRDA Commissioner

आमदार शेळके, जिल्हाधिकारी आणि PMRDA आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती देण्यासाठी ठोस निर्णय

May 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.