व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात शरद पवारांची तोफ धडाडणार! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गुरुवारी कार्यकर्ता संवाद मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोणावळा शहरात गुरुवारी (दि. 7 मार्च) कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 6, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Sharad-Pawar

Photo Courtesy : X / Sharad Pawar


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोणावळा शहरात गुरुवारी (दि. 7 मार्च) कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या मेळाव्याला स्वतः शरद पवार उपस्थित राहणार आहेत. लोणावळा शहरातील हॉटेल कुमार रिसॉर्ट येथे सकाळी 10 वाजता पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार हे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी दैनिक मावळला दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) अचानक लोणावळा शहर युवक अध्यक्ष बदलला. त्यामुळे लोणावळा शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. त्यातूनच पुढे तब्बल 137 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सामूहिक राजीनामे दिले. या प्रकाराने मावळ तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी लोणावळ्यातील या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. तसेच यशवंत पायगुडे यांसह काही निवडक कार्यकर्त्यांना घेऊन सिल्व्हर ओक येथे शरद पवारांची भेट घेतली. ( NCP Sharadchandra Pawar Party Worker Dialogue Rally In Lonavala Sharad Pawar Will Be Present )

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. 4) सकाळी दहा वाजता शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. तेव्हा शरद पवारांनी नाराज पदाधिकाऱ्यांची दखल घेतली, तसेच लोणावळा येथे मेळाव्याला येण्यास होकार दर्शवला. शरद पवार गुरुवारी (दि. 7 मार्च) लोणावळा आणि मावळातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार आहेत, अशी माहिती यशवंत पायगुडे, तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, विनोद होगले, संतोष कचरे, फिरोज शेख आदींनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

शरद पवार हे स्वतः आता मावळात येणार आहेत, त्यामुळे फक्त लोणावळाच नाहीतर तालुक्यातील इतर पक्षातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादीतील नाराज पदाधिकारी, कार्यकर्ते हे तुतारी वाजवणार, अशी जोरदार चर्चा सध्या होत आहे.

अधिक वाचा –
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात! ट्रक आणि ट्रेलर यांच्या धडकेत 2 जण जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway
– एका दुचाकी चोराला पकडले आणि चोरीला गेलेल्या 19 दुचाकींचा शोध लागला! तळेगाव दाभाडे पोलिसांची भन्नाट कामगिरी । Talegaon Dabhade
– वेहेरगाव जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा; माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा । Karla News


dainik maval jahirat

Previous Post

हुश्श..! पुण्यात प्रशासनाला ‘कात्रजचा घाट’ दाखवून पळालेल्या बिबट्याला पकडण्यात यश, रात्री सव्वा नऊ वाजता मोहिम फत्ते । Pune Katraj Park Leopard Update

Next Post

श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेची चमकदार कामगिरी, ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shri-ekvira-vidya-mandir-karla-school

श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेची चमकदार कामगिरी, 'माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.