व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना, नव्या परिमंडळाची निर्मिती, कोणते पोलिस ठाणे कोणत्या परिमंडळात? पाहा

पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात तिसऱ्या परिमंडळाला शासनाने मान्यता दिली होती. त्यानंतर आता आठ महिन्यांनी या परिमंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 17, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Pimpri-Chinchwad-Police

Photo Courtesy : Team Dainik Maval


पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात तिसऱ्या परिमंडळाला शासनाने मान्यता दिली होती. त्यानंतर आता आठ महिन्यांनी या परिमंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची सुरुवात 15 ऑगस्ट 2018 रोजी झाली होती. आयुक्तालयाच्या सुरुवातीला दोन परिमंडळांची रचना करण्यात आली. सुरुवातीला शहर पोलिसांच्या हद्दीत 14 पोलीस ठाण्यांचा समावेश होता. त्यानंतर चिखली, शिरगाव, महाळुंगे एमआयडीसी, रावेत हे चार पोलीस स्टेशन नव्याने सुरू करण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील वाढते नागरिकरण, औद्योगीकरण, शहरीकरण, शैक्षणिक संस्था, वाहनांची संख्या लक्षात घेता आणखी एका परिमंडळाची गरज निर्माण झाली, त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत तिसरे परिमंडळ मंजूर करून घेतले. ( Reorganization of circles in Pimpri Chinchwad Police Commissionerate creation of third circle )

सप्टेंबर 2023 मध्ये तिसऱ्या परिमंडळाला शासनाने मान्यता दिली. परिमंडळ तीनचे पहिले पोलीस उपायुक्त म्हणून संदीप डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आठ महिन्यानंतर तीनही परिमंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे. रावेत पोलीस ठाणे परिमंडळ दोनच्या वाकड विभागात होते. नव्या रचनेनुसार रावेत पोलीस ठाणे परिमंडळ एकच्या चिंचवड विभागात आणले आहे.

परिमंडळांची सुधारित रचना :
परिमंडळ एक

पिंपरी विभाग – पिंपरी पोलीस ठाणे, भोसरी पोलीस ठाणे, सांगवी पोलीस ठाणे
चिंचवड विभाग – चिंचवड पोलीस ठाणे, निगडी पोलीस ठाणे, रावेत पोलीस ठाणे

परिमंडळ दोन
देहूरोड विभाग – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे, देहूरोड पोलीस ठाणे, शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे
वाकड विभाग – वाकड पोलीस ठाणे, हिंजवडी पोलीस ठाणे
परिमंडळ तीन
चाकण विभाग – चाकण पोलीस ठाणे, महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे, आळंदी पोलीस ठाणे
भोसरी विभाग – दिघी पोलीस ठाणे, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे, चिखली पोलीस ठाणे

अधिक वाचा –
– आचारसंहिता लागण्याआधीच आमदार सुनिल शेळकेंनी मावळ तालुक्यासाठी खेचून आणला भरघोस निधी । MLA Sunil Shelke
– लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं, देशात सात टप्प्यात होणार मतदान, 4 जून रोजी अंतिम मतमोजणी, वाचा A टू Z माहिती
– मावळ भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान, गावोगावी जाऊन केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद । Maval BJP


dainik maval jahirat

Previous Post

मावळ लोकसभेत भाजपचा खासदार पाहिजे! बारणेंविरोधात मावळ भाजपा आक्रमक, बाळा भेगडेंच्या उमेदवारीसाठी वरिष्ठांना साकडे

Next Post

‘मावळ लोकसभा निवडणूकीत संजोग वाघेरे भरघोस मतांनी विजयी होणार!’ मावळसाठी इंडिया आघाडीने कंबर कसली

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Lok-Sabha-sanjog-waghere

'मावळ लोकसभा निवडणूकीत संजोग वाघेरे भरघोस मतांनी विजयी होणार!' मावळसाठी इंडिया आघाडीने कंबर कसली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.