मावळ तालुक्यातील तुंगार्ली गावातील युवक प्रसाद शंकरराव इंगुळकर याची ग्राम महसूल अधिकारी पदी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षेतून त्याची हि निवड झाली आहे. या निवडीबद्दल प्रसादचे सर्वत्र कौतूक होत आहे. लहानपणापासून असणारी अभ्यासाची आवड, जिद्द, चिकाटी व अभ्यासाचे योग्य नियोजन यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
घरची परीस्थिती हलाखीची असताना केवळ अभ्यासातील सातत्यामुळे यशाला गवसणी घालण्यात आल्याचे मत प्रसादने व्यक्त केले. प्रसादचे वडील हे खंडाळा येथील अंधवृद्धाश्रम येथून सेवानिवृत्त झाले आहेत. तर आई कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शिलाई मशीन चालवते. प्रसादचा बंधू विकास याची देखील यापूर्वी स्पर्धा परीक्षेतून भारतीय रेल्वे विभागात निवड झाली आहे. ( Prasad Ingulkar From Tungarli Maval Elected As village Revenue Officer )
एकाच घरातील दोन जणांची स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत निवड होण्याचे हे तुंगार्ली गावातील एकमेव उदाहरण आहे. प्रसाद आणि विकास यांनी आपल्या यशाचे श्रेय त्याचे शिक्षकबंधू कार्ला एकविरा विद्या मंदिराचे शिक्षक उमेश इंगुळकर आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना दिले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणाची शुक्रवारी अंतिम सुनावणी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी
– दैनिक मावळ ‘संवाद’ : अडथळ्यांच्या वाटेवरील प्रेरणादायी प्रवास, मराठीतील युवा दिग्दर्शक ‘हृदयमानव’ याच्यासोबत खास बातचीत
– जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून वडगाव मावळ येथे 150 पक्षीप्रेमींना चिमण्यांच्या कृत्रिम घरट्यांचे वाटप । Vadgaon Maval