व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे यांना ‘कर्तव्य दक्ष पुरस्कार’ जाहीर । Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे यांना यंदाचा 'कर्तव्य दक्ष पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 24, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Journalist-Dnyaneshwar-Waghmare-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ येथील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे यांना यंदाचा ‘कर्तव्य दक्ष पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव समिती वडगाव मावळ यांच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. गुरुवारी (दि. 28 मार्च) होणाऱ्या समारंभात ह्या पुरस्काराचे वितरण केले जाईल. मागील 34 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारे वाघमारे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वडगाव मावळ येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. दिनांक 25 मार्चपासून शिवजन्मोत्सव सोहळा सुरु होत आहे. या सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात शिवजंयतीच्या दिवशी (28 मार्च – तिथीनुसार) समितीमार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. ह्यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे यांना ‘कर्तव्य दक्ष’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. मावळचे आमदार सु निल शेळके, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. तर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी दैनिक मावळला दिली. ( Senior Journalist Dnyaneshwar Waghmare has been awarded Kartavya Daksh Award Vadgaon Maval )

34 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत –
वडगाव मावळ शहरात राहून ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे हे मागील 34 वर्षांपासून अविरतपणे पत्रकार म्हणून काम करत आहेत. 1990 सालापासून वाघमारे हे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सुरुवातीला दैनिक लोकसत्ता मध्ये त्यांनी 10 वर्षे तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यानंतर 2000 ते आता 2024 पर्यंत ते दैनिक सकाळमध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.

प्रामाणिक पत्रकार अशी तालुक्यात ख्याती –
पत्रकारितेच्या 34 वर्षांच्या कारकिर्दीत ज्ञानेश्वर वाघमारे यांनी विविध विषयांवर सडेतोड लिखाण केले. मावळ तालुक्यातील शेती, सहकार, पर्यटन, धरणग्रस्तांचे प्रश्न, पुणे-मुंबई हायवे भुसंपादन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, मावळ तालुक्याचे राजकारण, समाजकारण, विविध निवडणूका आदी विषयांवर पत्रकार वाघमारे सडेतोड लिखाण केले. त्यांना आजवरच्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ प्रवासात 50 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. पत्रकारितेसह वाघमारे यांनी विविध सामाजिक संस्था, संघटना यांवर देखील काम केले आहे.

अधिक वाचा –
– Maval Lok Sabha : महायुतीत मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कायम! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
– महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर । Pune News
– ‘पीडित मुलीला न्याय मिळाला, आता त्या कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार’, कोथूर्णे निर्भया प्रकरणावर आमदार सुनिल शेळकेंची प्रतिक्रिया


dainik maval jahirat

Previous Post

खासदार श्रीरंग बारणे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! बाळा भेगडे यांच्यानंतर मावळ लोकसभेसाठी भाजपाच्या ‘या’ नेत्याचे नाव पुढे । Maval Lok Sabha

Next Post

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार । Pune Lok Sabha Election 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Murlidhar-Mohol-Pune-Loksabha

'पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार । Pune Lok Sabha Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.