व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जनहित चॅरिटेबल ट्रस्टची नवीन कार्यकारिणी जाहीर; यंदा 1 मे रोजी तळेगाव येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

मावळातच नव्हे तर महाराष्ट्रभर सामुदायिक मंगल परिणय सोहळे होणे ही काळाची गरज आहे. आज काल लोकं लग्नासाठी लाखो रुपयांची उधळण करतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 26, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Janhit-Charitable-Trust-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळातच नव्हे तर महाराष्ट्रभर सामुदायिक मंगल परिणय सोहळे होणे ही काळाची गरज आहे. आज काल लोकं लग्नासाठी लाखो रुपयांची उधळण करतात, एकमेकांच्या चढाओढीने लग्न समारंभ पार पाडण्यासाठी पैसे कमी पडले तर जमिनी विकून लग्न करतात आणि याच कारणामुळे काही शेतकरी भूमिहीन झाल्याचे आपणास पाहवयास मिळत आहे. या सर्व बाबींना कुठेतरी आळा बसावा यासाठी जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा सोहळा घेण्यात येत असल्याचे प्रतिपादन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय भवार यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. दरम्यान सामुदायिक मंगल परिणय सोहळा नियोजन समिती देखील जाहीर करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

नवनिर्वाचित समिती खालील प्रमाणे;
अध्यक्ष – निलेश गोकुळ शिंदे, वराळे
उपाध्यक्ष – संदीप नामदेव ओव्हाळ, नायगाव
कार्याध्यक्ष – रुपेश उर्फ बंटी गायकवाड, कामशेत
महासचिव – रवी गंगाराम भवार, बौर
सहसचिव – शशिकांत गायकवाड, साते

खजिनदार – भावेश थोरात, मुंढावरे
सहखजिनदार – सिद्धार्थ भालेराव, वडगाव
संपर्क प्रमुख – विकास शिंदे, माळेगाव
सहसपर्क प्रमुख – महेश थोरात, वेल्हवली
प्रसिद्धी प्रमुख – सचिन शिंदे, अजिवली व प्रफुल ओव्हाळ, शिळीम
कायदेशीर सल्लागार – ऍड. योगेश गायकवाड, ऍड. मयूर शिंदे, ऍड. अमोल देसाई,

विभागीय उपाध्यक्ष –
पवन मावळ – प्रा. राहुल सोनवणे, कोथुर्णे
नाणे मावळ – संदीप बबन जाधव, वळक
आंदर मावळ – बाजीराव ओव्हाळ
लोणावळा शहर –
कामशेत शहर – महेंद्र वंजारी, कामशेत
वडगाव शहर – नितीन आल्हाट, वडगाव
तळेगाव शहर – आनंद बबन घोडके, तळेगाव
देहूरोड शहर – अमोल नाईकनवरे, देहूरोड

सोशल मीडिया प्रमुख – समाधान सोनवणे,साते, रुपाली क्षीरसागर, लोणावळा
वधू नियोजन प्रमुख – सारिका सोनवणे, कामशेत
वधू नियोजन समिती – अनिता गायकवाड, माया वंजारी, कामशेत
संघटक – प्रवीण सरोदे, विपुल जाधव,सचिन साळवे,विशाल वाघमारे, किरण ओव्हाळ, सचिन ओव्हाळ, तुकाराम डोळस, संदीप चौरे, कुणाल घोडके, गणेश गायकवाड, चंद्रकांत थोरात,

Novel NIBR Ads

प्रसंगी सोहळा समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश शिंदे म्हणाले की, आगामी सामुदायिक मंगल परिणय सोहळा भव्य प्रमाणात यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल त्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार प्रसार जनसंपर्क अभियान राबविण्यात येईल. यावेळी जनहित चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त संजय गायकवाड, प्रभाकर वाघमारे, आनंद वंजारी, दलितांनंद थोरात, सचिन भवार, संदीप ओव्हाळ, ज्योती शिंदे आदी उपस्थित होते. ( Janhit Charitable Trust Maval Taluka Community marriage ceremony Talegaon Dabhade )

जनहित चॅरिटेबल ट्रस्ट ने निवड केलेल्या या समितीवर समाजाच्या विविध सर्वच क्षेत्रातील मंडळी सामावून घेण्यात आल्याने सामाजिक एकसंघतेचे चित्र निर्माण झाले असून त्यामुळे समाजामध्ये एक उत्साह निर्माण झाल्याचे भावना आंबेडकरी समाजामध्ये व्यक्त होत आहे. विवाहनिश्चित झालेल्या वधू-वरांनी सामुदायिक मंगल परिणयसोहळा नाव नोंदणीसाठी पालकांसह संपर्क साधावा तसेच हा भव्य सोहळा सामूहिक अर्थसंकलनातून संपन्न होत असल्याने इच्छुक दानशूर देणगीदारांनीही ट्रस्टकडे संपर्क साधावा असे आवाहन यावेळेस पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ट्रस्टचे महासचिव पत्रकार सचिन कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ट्रस्टचे कोषाध्यक्ष प्रवीण भवार यांनी मानले.

अधिक वाचा –
– अतिवेगाने घात केला…! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू । Accident on Mumbai Pune Expressway
– वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळ, ऐतिहासिक दगडी गोटी उचलण्याच्या स्पर्धेत नव्या विक्रमासह सौरभ ढोरे प्रथम । Vadgaon Maval
– महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! महादेव जानकर यांचा रासप पक्ष महायुतीसोबत, लोकसभेची एक जागा मिळणार । Lok Sabha Election 2024


dainik maval jahirat

Previous Post

वराळे येथील शेतकरी कुटुंबातील आदर्श माता शकुंतला मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन । Maval News

Next Post

लोकसभा निवडणूकीत मतदान करताना ‘ही’ 12 ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार, पाहा यादी । Lok Sabha Election 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
voting

लोकसभा निवडणूकीत मतदान करताना 'ही' 12 ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार, पाहा यादी । Lok Sabha Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.