मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे. कार्ला येथे आई एकविरा देवीचा अभिषेक करून त्यांनी मावळ विधानसभा क्षेत्रातील गावभेट दौरा सुरु केला. स्थानिक शेतकरी, कामगार यांच्या समस्यांना हात घालून वाघेरे हे प्रचाराच्या कामाला लागले आहेत, त्यामुळे त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
वाघेरे यांच्या प्रचारात महाविकासआघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील हिरहिरीने सहभागी होताना दिसत आहेत. स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा मुद्दा वाघेरे त्यांच्या गावभेटीत बोलून दाखवत आहेत. तसेच औद्यागिकीकरण होत असताना चांगले उद्योगधंदे तालुक्यातून बाहेर गेले किंवा जात असल्याच्या मुद्द्याला हात घातल्याने कामगारांच्या भावनाही त्यांच्याप्रती पॉझिटिव्ह बनताना दिसत आहेत. ( Shiv Sena Uddhav Thackeray Party Maval Lok Sabha Constituency Village Visit of candidate Sanjog Waghere )
मावळ तालुक्याचे राजकारण हे नात्यागोत्याचे, गावकी-भावकीचे मानले जाते. अशात संजोग वाघेरे यांच्या प्रचारात मावळ तालुक्यातील त्यांचे नातेवाईक देखील प्रचारात उतरल्याचे दिसतायेत. एकीकडे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे देखील नेते-पदाधिकारी यांच्या गाठीभेटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे संजोग वाघेरे मात्र थेट जनतेत आणि वाडीवस्तीवर जाऊन प्रचारात गुंतल्याचे दिसत आहे. ह्या आघाडीवर तरी वाघेरे पुढे गेल्याचे दिसत आहे.
‘गद्दारांना गद्दारी काय असते याचा धडा शिकविण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते व सामान्य मतदार सज्ज झाला असून आता त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब करण्यासाठी वाट पहावी लागणार आहे’, असे संजोग वाघेरे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. विभागातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, तरुणांना नोकऱ्या, कामगारांना न्याय, महिलांना स्वयंरोजगार आदी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्नेहल ओव्हाळ यांची बिनविरोध निवड । Maval News
– RMC वाहनचालकांची बेफिकीरी, देहूरोडजवळ भीषण अपघात! मावळ तालुक्यातील तलाठी सुदैवाने बचावला । Fatal Accident On Old Mumbai Pune Highway
– खासदार श्रीरंग बारणेंचे बळ वाढले, पनवेल विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश । Maval Lok Sabha 2024