व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने रस्त्याची रुंदी आणि दिशा बदलल्यास…काम थांबवू’, वडगाव भाजपचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा

वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) शहरात मागील एक वर्षापासू वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्त्याचे काम सुरु आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 24, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Vadgaon-Maval-BJP

Photo : Ananta Kude


वडगाव मावळ शहरात मागील एक वर्षापासू वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र, या विकासकामाला विलंब होत असल्याने तसेच त्यामुळे नित्याची वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वडगाव भाजपाने सार्वजनिक बांधकाम विभागाला महत्वाचे निवेदन दिले आहे, त्यात वडगाव नगरपंचायतमधील सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यानुसार रस्त्याची दिशा आणि रुंदी ठरवण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे कुणाच्याही सांगण्यानुसार आणि त्यांच्या सोईनुसार तुम्ही पुढे रेटत असलेल्या कामाचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे ठणकावण्यात आले आहे. ( BJP Statement To Public Works Department Regarding Road Construction In Vadgaon Maval City )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“श्री खंडोबा मंदिरापासून श्री महादेव मंदीरासमोरील कोपऱ्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची आखणी करताना आणि प्रत्यक्ष काम करताना ठिकठिकाणी आपण हेतुपुरस्सर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घर व दुकानासमोरील ओटे वाचवण्यासाठी त्यांच्याच समोरील बाजूस असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या घराच्या आणि दुकानाच्या थेट उंबऱ्यावर देखील हातोडा टाकला आहे. सदर रस्त्याचे बांधकाम पुर्णत्वास नेत असताना आपण करत असलेले काम मनमानी आणि एका बाजूला झुकत्या स्वरुपाचे आहे. या रस्त्याच्या कामात सर्वांना समान नियम लागू होणे अपेक्षित असताना नगरपंचायतमधील सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यानुसार चालू असलेले काम अत्यंत चुकीचे आहे”, असा गंभीर आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – वडगाव शहर पाणीपुरवठा योजनेवरुन राजकारण तापलं! ‘अपयश झाकण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु’, अनंता कुडेंची बोचरी टीका

तसेच, “यापुढील रस्त्याचे बांधकाम करताना बाजारपेठेमध्ये ठरलेल्या रुंदीनुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली घरे किंवा दुकाने यांना समसमान नियम लावावा. मोकळी जागा आणि नगरपंचायत मधील सत्ताधारी यांच्या सोयीनुसार रस्त्याची दिशा व रुंदीमध्ये बदल करु नये. वडगाव मधील रोड चे बाजूला आसलेले व्यवसायिक व नागरिक यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा अन्यायी व एककल्ली पद्धतीने चालू असलेले रस्त्याचे काम वडगाव शहर भाजपाच्या वतीने तत्काळ थांबविण्यात येईल,” असा इशारा शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

याप्रसंगी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, गटनेते दिनेश ढोरे, मा प्रभारी सरपंच संभाजी म्हाळसकर, वडगाव भाजपा कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे, नगरसेवक किरण म्हाळसकर, ऍड विजयराव जाधव, भूषण मुथा, संतोष म्हाळसकर, सरचिटणीस कल्पेश भोंडवे, मकरंद बवरे, रविंद्र म्हाळसकर, शरद मोरे, हरीश दानवे, संतोष द.म्हाळसकर आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– उकळते कालवण अंगावर सांडले, साडेतीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी, पिपोळीतील घटना
– कुटुंबातील कुणी कर्जदार व्यक्ती कोरोनाने गेला असल्यास ही बातमी नक्की वाचा, सहकार विभागाचा दिलासादायक निर्णय


dainik maval jahirat

Previous Post

Video : कार्मेल कॉन्व्हेंट खोपोली येथे लायन्स क्लबच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन

Next Post

लोणावळा जवळील वलवण पुलावर टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक, टेम्पो चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident

लोणावळा जवळील वलवण पुलावर टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक, टेम्पो चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.