Dainik Maval News : मावळ तालुक्यातील एका निवासी आश्रम शाळेत दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणाची तत्काळ दखल घेत, सदर अत्याचाराची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.
प्रकरणातील आरोपी हा कंत्राटी शिक्षक असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. आरोपीने त्याने दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
- ही बाब अतिशय निंदनीय असून हलाखीची परिस्थिती असल्यामुळे शैक्षणिक कारणास्तव निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलांची सुरक्षा धोक्यात असल्याचे यातून उघड झाले आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसंदर्भात कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.
सदर बाल लैंगिक अत्याचाराबाबत सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर पॉक्सो इत्यादी प्रचलित तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात यावी. सोबत प्रकरणातील अल्पवयीन मुलांचे संरक्षण व समुपदेशन योग्य पद्धतीने करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
तसेच, राज्यातील निवासी आश्रम शाळांमध्ये गुड टच बॅड टच बाबत मुलांना माहिती दिली जात असल्याची खातरजमा करावी. राज्यातील निवासी आश्रम शाळांमधील बाल लैंगिक अत्याचार विषयक घटना टाळण्यासाठी जिल्हानिहाय बाल कल्याण समित्या गठीत करण्यात आल्या असल्याबाबत खातरजमा करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी