Dainik Maval News : आज, दि. १३ मार्च २०२६ रोजी सकाळच्या सुमारास मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर अमृतांजन ब्रिज परिसरात मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस (बोरघाट), डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच मृत्युंजय देवदूत पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करत अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली.
दरम्यान, ट्रक हटविण्यासाठी लागणाऱ्या वेळेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोणावळा मार्गे जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर वाहतूक वळविण्यात आली होती. त्यामुळे मोठी कोंडी होण्यापासून दिलासा मिळाला.
या अपघातात ट्रकमधील दोन जणांना किरकोळ स्वरूपाचा मार लागल्याने त्यांना उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे समजते.
क्रेनच्या मदतीने ट्रक सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एक्सप्रेस वेवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली असून सध्या वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

