व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 16, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा शासन निर्णय जाहीर झाला असून, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला आंद्रा धरण (ता. मावळ, जि. पुणे) येथून घरगुती (पिण्याच्या) वापरासाठी ५.०१४ दशलक्ष घनमीटर (MCM) इतक्या पाण्याचा बल्क वॉटर एन्टायटल्मेंट ( Bulk Water Entitlement ) मंजूर करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सन २०४८ पर्यंतचा विचार करून घेतलेला हा निर्णय शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला दीर्घकालीन स्थैर्य देणारा ठरणार आहे. यापूर्वी इंद्रायणी व पवना नदीतून काही प्रमाणात पाणी आरक्षण असले तरी, वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही अतिरिक्त मंजुरी देण्यात आल्याने तळेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या निर्णयामागे आमदार सुनील शेळके यांचा सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. धरणातून पाणी आणण्याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करत शासनस्तरावर विषय लावून धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, तळेगाव शहरातील दीर्घकालीन पाणीटंचाईचा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

तळेगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक मूलभूत सुविधांमध्ये पाणीपुरवठा हा कणा मानला जात असल्याने, या निर्णयामुळे मावळ तालुक्याच्या शहरी विकासालाही गती मिळणार आहे.

शासनाने या पाणी आरक्षणास काही अटी व शर्ती लागू केल्या असून, पाणी वापरासाठी आवश्यक करारनामे, नियोजनबद्ध वितरण व्यवस्था, जलप्रदूषण नियंत्रण आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बंधनकारक राहणार आहे. मंजूर आरक्षणानुसार प्रत्यक्ष पाणी उचल सुरू न झाल्यास आरक्षण रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. एकूणच, आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांमुळे तळेगाव दाभाडे शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नावर मोठा दिलासा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात
– पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संयुक्त संघटनेने घेतली आमदार सुनील शेळके यांची भेट
– मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

Next Post

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.