Dainik Maval News : मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या कामशेत येथील जागेमध्ये शेतकरी भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान मंत्री पाटील यांनी तात्काळ निधी मंजूर करून देण्याचे आश्वासनही दिले असल्याची माहिती संस्थेचे सभापती किरण हुलावळे व उपसभापती सुनीता अमोल केदारी यांनी दिली.
आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघाचे सभापती किरण हुलावळे, उपसभापती सुनीता केदारी यांच्यासह संचालक माणिक गाडे, शहाजी कडु, गणेश विनोदे, बाजीराव वाजे, प्रमोद दळवी, शरद नखाते, विष्णु घरदाळे, आशा मारुती खांडभोर, सचिव किरण लोहर यांनी मंत्री बाबासाहेब पाटील यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन निवेदन दिले व शेतकरी भवन उभारण्याच्या दृष्टीने चर्चा केली.
खरेदी विक्री संघाची कामशेत येथे प्रशस्त व मध्यवर्ती ठिकाणी जागा असून याच जागेमध्ये संस्थेच्या मालकीचे गोडाऊन, दुकाने व कार्यालय आहे. सबंधित इमारती ह्या जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून याच ठिकाणाहून संस्थेच्या माध्यमातून विविध कामकाज केले जात आहे. तसेच त्याठिकाणी कुठल्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, याशिवाय या इमारती अपुऱ्या पडत आहेत.
त्यामुळे याठिकाणी शेतकरी भवन उभारल्यास तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या दृष्टीने ही वास्तु अत्यंत महत्त्वाची ठरणार असून शेतकर्यांना सुलभ सुविधा उपलब्ध करून देता येतील. तसेच एकप्रकारे संस्थेचीही उन्नती होणार आहे. त्यासाठी निधी मंजूर करावा व शेतकरी भवन उभारावे अशी मागणी करण्यात आली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम
– लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ
– वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन
– मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक