व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण आता कोर्टातून मंत्रालयात पोहोचले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 26, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण आता कोर्टातून मंत्रालयात पोहोचले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी राज्याच्या पणन मंत्रालयाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बाजार समिती बरखास्त प्रकरणी वादाचा चेंडू न्यायालयातून थेट मंत्रालयात पोहोचला आहे. येत्या २८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

मावळ तालुक्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा यांच्यातील संघर्ष नेहमीच ठळक राहिला आहे.

मावळ बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ संचालक तर, भाजपाचे केवळ पाच सदस्य होते. असे असतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करीत भाजपचे सुभाष जाधव सभापतीपदी विराजमान झाले. यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक चिघळला. दरम्यान बाजार समितीतील सत्ता पालटानंतर आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे आणि तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ संचालकांना सामूहिक राजीनामे देण्याचे निर्देश दिले होते.

तेरा संचालकांच्या राजीनाम्यानंतर गणपूर्ती होत नसल्याने बाजार समितीचे कामकाज चालू शकत नसल्याने उपजिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांनी बाजार समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेत प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती केली.

दरम्यान, या निर्णयाविरोधात भाजपच्या पाच सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पणन मंत्र्यांनी दोन आठवड्यांच्या आत सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय आता मंत्रालय स्तरावर होणार आहे.

दरम्यान, २८ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी उपजिल्हा निबंधक प्रकाश जगताप आणि सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच राज्याचे पणन मंत्री भाजपाचे असल्याने या निकालाकडे मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा
– सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी
– लोणावळा शहरात ‘व्हिला’ ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

Next Post

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.