व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

२० ते २६ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या या व्याख्यानमालेत “सा विद्या या विमुक्तये” या तत्वावर आधारित विविध विषयांची समृद्ध उधळण करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 27, 2026
in लोकल, शहर
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा येथे आयोजित वसंत व्याख्यानमालेची सांगता ‘ऋतु हिरवा’ या बहारदार संगीतमय कार्यक्रमाने उत्साहात पार पडली. धनंजय म्हसकर, नचिकेत देसाई आणि केतकी भावे-जोशी या गुणी कलाकारांनी सादर केलेल्या सुरेल मैफलीने आणि अनघा मोडक यांच्या शब्द सुमनानी उपस्थित रसिकांची मनं जिंकत कार्यक्रमाला दाद मिळवून दिली.

या कार्यक्रमाप्रसंगी लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव भोंडे, सचिव राधिका भोंडे, नगरसेवक निखिल कवीश्वर, अनिल गवळी, नगरसेविका आरती तिकोने, मारुती तिकोने, नारायण पाळेकर तसेच वसंत व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष नितीन तिकोने आदी मान्यवर उपस्थित होते.

२० ते २६ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या या व्याख्यानमालेत “सा विद्या या विमुक्तये” या तत्वावर आधारित विविध विषयांची समृद्ध उधळण करण्यात आली. विचारांना चालना देत संस्कारांची ऊब देणाऱ्या या व्याख्यानमालेत विविध विषयांवर प्रभावी मांडणी झाली.

प्रथम पुष्प ‘मायलेकरं’ या अभिवाचन कार्यक्रमातून डॉ. गिरीश ओक, मृणाल देव-कुलकर्णी आणि चैत्राली अभ्यंकर यांनी आई-मुलाच्या नात्याची कोमलता रसिकांसमोर उभी केली. डॉ. अरुणा ढेरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सादरीकरणाने भावविश्व समृद्ध केले.

द्वितीय पुष्प ‘शाळा आमची मराठी’ या विषयावर श्रीमती चिन्मयी सुमीत यांनी मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करत “भाषा ही संस्कृतीची ओळख आहे” हा संदेश दिला.
तृतीय पुष्प ‘पसायदान’ या विषयावर इंद्रजीत देशमुख यांनी अत्यंत विचारप्रवर्तक व्याख्यान देत माऊलींच्या संदेशाचे आधुनिक संदर्भात विश्लेषण केले. “दुष्टांचा नाश नव्हे, तर त्यांच्या वृत्तीचे परिवर्तन व्हावे,” हा संदेश त्यांनी ठळकपणे मांडला.

चतुर्थ पुष्पात आनंद शिंदे व रोहन तावरे यांनी वन्यजीवांसोबतचे अनुभव कथन करत ‘भूतदया’ या मूल्याची जाणीव करून दिली. पाचव्या पुष्पात ‘नाटक नावाचा ताराफा’ या विषयावर अभिनेते व नाटककार अतुल पेठे यांनी रंगभूमीचे अंतरंग उलगडत “रंगमंच हे जीवनाचे प्रतिबिंब आहे” असे सांगितले.

सहाव्या पुष्पात ‘कलावंतांचे अनुभव’ या सत्रात अतुल शेवते यांनी कलाक्षेत्रातील संघर्ष व समाधान यांचा प्रवास उलगडला.

समारोपाच्या दिवशी ‘रंगाई निर्मित ऋतु हिरवा ’ या विशेष कार्यक्रमातून कु. अनघा मोडक यांच्या संकल्पनेतून आणि प्रशांत लळीत यांच्या संगीत संयोजनातून रंग, स्वर आणि भावना यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

एकूणच, विविध विषयांची समृद्ध मेजवानी देत ही वसंत व्याख्यानमाला विचारप्रवर्तक ठरली असून ‘ऋतु हिरवा’ या संगीतमय कार्यक्रमाने तिची संस्मरणीय सांगता झाली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा
– सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी
– लोणावळा शहरात ‘व्हिला’ ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा


dainik maval jahirat

Previous Post

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

Next Post

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.