Dainik Maval News : जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना रविवारी (दि. २६ एप्रिल) रात्री अकराच्या सुमारास मावळ तालुक्यातील जाधववाडी येथे घडली.
रवींद्र रमाकांत जाधव (वय ४५, रा. जाधववाडी, ता. मावळ) असे खून झालेल्या चुलत्याचे नाव आहे. विशाल सुखदेव जाधव याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीयांची जाधववाडी येथे एक एकर नऊ गुंठे जमीन आहे. या जमिनीच्या वाटपावरून त्यांच्यात वाद होता.
दरम्यान, एमएसआरडीसीची पाइपलाइन त्यांच्या शेतातून गेली. त्याचे त्यांना पाच लाख रुपये मिळाले होते. या पैशांच्या वाटपावरूनदेखील त्यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता.
रवींद्र जाधव हे आईसोबत जाधववाडी येथे राहत होते. रविवारी रवींद्र आणि पुतण्या विशाल यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यातून विशाल याने कोयत्याने रवींद्र यांच्यावर वार केला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा
– सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी
– लोणावळा शहरात ‘व्हिला’ ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा


