व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

२९ मेपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत; एकूण ८६७ मतदारांचा समावेश

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 24, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Draft electoral roll voting list

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत एकूण ८६७ मतदारांचा समावेश आहे. त्यामध्ये ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली. प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि. २९ मे २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये पुढील मतदान केंद्रांचा समावेश आहे :
१) श्री शिवाजी प्रिपेरेटरी मिलिटरी स्कूल, जुनी दगडी (हेरिटेज) इमारत, शिवाजीनगर, पुणे
२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पब्लिक स्कूल, प्राथमिक शाळा, खराळवाडी, पिंपरी चिंचवड
३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंचर
४) महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर
५) विद्याधाम प्रशाला, शिरुर
६) नवीन प्रशासकीय इमारत (तहसील कार्यालय), दौंड
७) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, मुलींची शाळा, बारामती
८) एमईएस वाघिरे हायस्कूल, सासवड
९) श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कन्याशाळा, भोर
१०) न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा, वडगाव मावळ
११) रयत शिक्षण संस्थेचे साधना प्राथमिक विद्यालय, माळवाडी, हडपसर या ठिकाणांचा समावेश आहे.

मतदानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पात्र सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्र सदस्य मतदार म्हणून समावेश करण्यात आला आहे.

प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे निवडणूक विभागाच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली असून आवश्यक असल्यास मतदार यादीवर मुदतीत हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. यादीवर हरकत ७ नंबर, यादीत नावं समाविष्ट करणे १७ नंबर, नावात बदल करणे ८ नंबर फॉर्म भरून देता येईल.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे


dainik maval jahirat

Previous Post

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

Next Post

आमदार शेळके, जिल्हाधिकारी आणि PMRDA आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती देण्यासाठी ठोस निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Concrete decisions to accelerate Lonavala Sky Walk project joint meeting of MLA Sunil Shelke District Collector PMRDA Commissioner

आमदार शेळके, जिल्हाधिकारी आणि PMRDA आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती देण्यासाठी ठोस निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.